शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

माय या पोरेसन काय व्हई, कईन या शाळा चालू व्हतीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:19 IST

१७ महिने उलटून चालले तरी अजूनही प्राथमिक शाळा चालू झालेली नाही. तिसरी लाट उंबरठ्यावर असल्यामुळे शासनाने अजूनही शाळा चालू ...

१७ महिने उलटून चालले तरी अजूनही प्राथमिक शाळा चालू झालेली नाही. तिसरी लाट उंबरठ्यावर असल्यामुळे शासनाने अजूनही शाळा चालू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वर्ष उलटून गेले तरीही लहान बालके घरातच असल्याने त्यांचे आई-वडील त्यांची शाळा केव्हा चालू होईल? अशा विचारात असून, मुले घरी राहून आता खूपच खोडकरपणा करायला लागल्यामुळे आई-वडीलही त्यांच्या भविष्याच्या चिंतेत आहेत. दुसरी लाट ओसरल्यानंतर या शैक्षणिक वर्षात तरी प्रत्यक्षात शाळा चालू होतील, असे पालकांना वाटत होते. मात्र तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना अधिक राहील, असे भाकीत वर्तविले आहे. यामुळे सध्या तरी शासनाने प्रत्यक्ष शाळा चालू करण्याचा निर्णय घेतलेला नाही.

एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी मुले शाळेत गेली नसल्याने केवळ खेळून - खेळूनही मुले बोर झाली आहेत. तसेच घरात मुले आई-वडील, आजी-आजोबांजवळ दिवसभर राहिल्यामुळे मुलांना ना अभ्यास, ना ट्युशन, ना शाळा त्यामुळे मुले केवळ मस्ती आणि टीव्ही पाहत असल्यामुळे पालक कंटाळले आहेत. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत, ते मुलं ऑनलाईन क्लास जॉईन करून घेत असतात. मात्र ज्या पालकांकडे स्मार्ट फोन नाही, त्यांची मुले केवळ दिवसभर खेळ खेळण्यात तसेच आई - वडिलांजवळ व खोडकरपणा करण्यात आपला वेळ घालवत आहेत. सुरुवातीला कोणतीही गोष्ट थोडी बरी वाटते. मात्र केवळ खेळ - खेळून तसेच रिकामे राहून मुले तर कंटाळली आहेत. पण केवळ घरीच राहिल्यामुळे मुलांच्या वर्तणुकीतही बदल झाला आहे. त्यामुळे पालकही आता त्रासले आहेत.

मुले प्रत्यक्षात शाळेत गेल्यावर शिक्षकांचा धाक असल्यामुळे ते घरी थोडाफार अभ्यास करत असतात. मात्र सध्या ऑनलाईनमुळे प्रत्यक्षात शिक्षकांचा धाक नसल्यामुळे मुले ऑनलाईनचा अभ्यासही करण्यास टाळाटाळ करीत आहेत. शिवाय ज्या मुलांकडे ऑनलाईनसाठी स्मार्टफोन नाही, त्या मुलांना तर आपल्याला काय अभ्यास दिला आहे? हेही कळत नाही. म्हणून त्यांचा अभ्यास करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा मुलांना पालकांनी काही तरी अभ्यास सांगितला तरी ते त्याकडे दुर्लक्ष करीत असतात. आणि दिवसभर खेळ खेळण्यात अथवा खोडकरपणा करण्यात व्यस्त असतात.

शिकलेली आई घराला पुढे नेई असे म्हणतात. मात्र आता परिस्थिती उलटी झाली आहे. पैसेवाली आई घरा दाराला पुढे नेई, असे सध्याचे चित्र दिसत आहे. कारण ज्या कुटुंबात स्मार्टफोन आहेत, त्यांची मुले ऑनलाईन क्लास जॉईन करत असून, शिक्षकांनी शिकविलेले थोडेफार त्यांच्या बुद्धीत बसत आहे. मात्र ज्या कुटुंबात स्मार्टफोन नाही, त्यांची मुले या ऑनलाईन शिक्षणापासून कोसो दूर आहेत. त्यांच्या कुटुंबात स्मार्टफोन नसल्यामुळे ऑनलाईन म्हणजे काय? हेसुद्धा त्यांना समजणे मुश्कील झाले आहे. म्हणून अशा गरीब कुटुंबात स्मार्टफोन नसल्यामुळे त्यांची आई जरी शिकलेली राहिली तरी सध्या ऑनलाईनच्या जमान्यात गरीब कुटुंबातील शिकलेली आई स्मार्टफोनअभावी घरादाराला पुढे कशी नेईल? असा प्रश्न सध्या तरी गरीब कुटुंबातील पालकांना सतावत आहे.

प्रत्यक्षात शाळा चालू होत्या तेव्हा मुलांच्या तोंडून अभ्यास, होमवर्क, ट्युशन, वही-पेन, पुस्तक असे शब्द ऐकायला मिळत होते. मात्र आता एक वर्ष उलटून गेला तरी मुले शाळा बंद असल्यामुळे घरीच असल्याकारणाने त्यांच्या जागेवर सॅनिटायझर, कोरोना, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, लस असे शब्द ऐकायला भेटत आहेत. म्हणून केव्हा शाळा चालू होतील आणि मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत सुधारणा होईल. या विचारांनी आम्ही त्रस्त आहोत. - सुशीलाबाई हरी पाटील, जयनगर.