‘खैर’ लाकडाची वाहतूक करणा:या दोघांना अटक

By Admin | Updated: June 2, 2017 12:41 IST2017-06-02T12:41:11+5:302017-06-02T12:41:11+5:30

वन विभागाच्या पथकाने खैर जातीचा अवैध लाकुड वाहतुक करणारा ट्रकचालक व लाकुड असा एकूण 9 लाख 86 हजार 641 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला़

'Well' wood transporters: Both of them are arrested | ‘खैर’ लाकडाची वाहतूक करणा:या दोघांना अटक

‘खैर’ लाकडाची वाहतूक करणा:या दोघांना अटक

 ऑनलाईन लोकमत

नवापूर,दि.2- विसरवाडी ते कोंडाबारी रस्त्यावर गस्त करीत असताना वन विभागाच्या पथकाने खैर जातीचा अवैध लाकुड वाहतुक करणारा ट्रकचालक व लाकुड असा एकूण 9 लाख 86 हजार 641 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला़
वनविभागाचे अधिकारी व कर्मचा:यांनी गस्त करीत असताना संशयीत ट्रक एमएच 04 सीयु 8683 ला अटकाव करुन तपासणी केली असता त्यात, 12.663 घनमीटर असलेले खैर लाकूड अवैधरित्या वाहून नेत असल्याचे स्पष्ट झाल़े 86 हजार 641 रुपये किमतीचे लाकुड व 9 लाख रुपये किमतीचा ट्रक असे एकूण 9 लाख 86 हजार 641 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आह़े यात बलजितसिंग जलावरसिंग बरार, लक्कीकुमार अमृतलाल भास्कर दोन्ही राहणार चंदीगढ यांना अटक करण्यात आले आह़े नंदुरबार वनविभागातील सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे, धडगाव येथील सहाय्यक वनसंरक्षक एस़आऱ चौधरी, नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे,नंदुरबार वनक्षेत्रपाल ज़ेए़  शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: 'Well' wood transporters: Both of them are arrested