शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीअभावी पाणी जाते गुजरातमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या नवापूर तालुक्यातील नवागाव गावाजवळील सरपणी नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे (केटीवेअर) ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या नवापूर तालुक्यातील नवागाव गावाजवळील सरपणी नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे (केटीवेअर) दरवाजे गेल्यावर्षीच्या महापुरात वाहून गेल्याने पाणी अडविले जात नाही. त्यामुळे गावकरी व शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. बहुतांश सिमेंट नाला बांध गाळाने भरले आहेत. पाणी अडविण्याच्या या छोट्या-छोट्या प्रकल्पांकडे होत असलेले दुर्लक्षातच दुष्काळाची कारणे दडली आहेत. केटीवेअर दुरुस्त न झाल्यास शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा जि.प. सदस्य अजित नाईक यांनी दिला आहे.माजी आमदार सुरूपसिंग नाईक हे संबंधित विभागाला बंधारा दुरूस्तीसाठी अनेकवेळा भेटले. लघुसिंचन अधिकाºयांना केटीवेअर दुरूस्ती करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. परंतु कुठेही उपाययोजना तात्काळ करण्यात आली नाही. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागण प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात जलसाठा सोडण्यात येतो. केटीवेअर नादुरुस्त असल्याने ते पाणी थेट गुजरात राज्यात वाहून जात आहे. तालुक्यातील धायटा परिसरातील आदिवासी शेतकºयांना पाण्याचा लाभ मिळत नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. पाण्याची पातळीही खोल गेली आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी या समस्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. नवापूर तालुक्यातील कमी पावसामुळे दुष्काळाचे संकट आल्याचे मानले जात असले तरी पडलेला पाऊस अडविण्यात आला नाही. तालुक्यातील केटीवेअरच्या दरवाजांची स्थिती नाजूक बनली आहे.‘धरण उराशी अन् शेतकरी उपाशी’ अशी परिस्थिती नवागाव गावातील शेतकºयांची झाली आहे. नवापूर तालुक्यातील नागण प्रकल्पाचे सोडलेले पाणी केटीवेअर नादुरुस्त असल्याने ते पाणी वाहून जाते. धरणाचा पाण्याचा लाभ मिळत नसून धरण केवळ नावालाच आहे. सरपंच व ग्रामपंचायतीकडूनही केटीवेअरची दुरूस्तीसंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असून उपाययोजना झाली नाही. पाण्यासाठी आदिवासी शेतकरी वर्ग मरमर करीत आहे. जलसंपदा विभागाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नवागावच्या सरपंच शर्मिला प्रकाश नाईक यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.केटीवेअर दुरूस्तीचे काम मंजूर झाले आहे तरीही दुरूस्ती होत नाही. दरवाजे बसवले नाही. नवापूर तालुक्यातील आदिवासी शेतकरी पाण्याच्या समस्याने अडचणीत आला आहे. जनावरांना पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात जलसंपदा विभागाचे अधिकारी या समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही ही शोकांतिका आहे. महाराष्ट्र राज्यातील पाणी महाराष्ट्रातील शेतकºयाला मिळत नसून गुजरात राज्यात निघून जाते. गेल्या दोन वर्षापासून हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष देत नसून त्वरित उपाययोजना न केल्यास शेतकरी आंदोलन करतील.-अजित नाईक, जि.प. सदस्य, उमराण गट, ता.नवापूर.