शहाद्यात टायर दुकानासह वॉटर एटीएम फोडून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:45 IST2019-12-27T12:44:56+5:302019-12-27T12:45:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील शहरात दोन ठिकाणी चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून चोरट्यांनी रोख रकमेसह मुद्देमाल लंपास ...

Water ATM with a tire shop stolen | शहाद्यात टायर दुकानासह वॉटर एटीएम फोडून चोरी

शहाद्यात टायर दुकानासह वॉटर एटीएम फोडून चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील शहरात दोन ठिकाणी चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून चोरट्यांनी रोख रकमेसह मुद्देमाल लंपास केला आहे़ बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली़
डोंगरगाव रस्त्यावर अंकुश पाटील यांच्या मालकीच्या टायरच्या दुकानाचे पत्रे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत दुकानाच्या ड्रॉवरमधील सहा हजार रुपयांसह मोबाईल व त्याचे चार्जर चोरी करुन नेले़ सकाळी अंकुश पाटील यांनी दुकान उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला़ अंकुश पाटील यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दरम्यान चोरट्यांनी आपला मोर्चा दोंडाईचा रोडवरील सप्तशृंगी माता मंदिरासमोर बसवलेल्या वॉटर एटीएमकडे वळवतएटीएम फोडून चोरी केली़ एटीएममध्ये साधारण ४०० रुपये होते असा अंदाज आहे़ चोरीची ही घटना लगतच्या एका दुकानातील सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्याने पोलीसांकडून तपास सुरु आहे़

Web Title: Water ATM with a tire shop stolen