शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
5
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
6
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
7
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
8
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
9
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
10
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
11
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
12
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
13
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
14
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
15
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
16
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
17
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
18
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
19
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
20
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल योजनेचा लाभ न मिळाल्यास बेेमुदत उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST

नंदुरबार - तालुक्यातील उमर्दे गावात २०११पासून आजतागायत एकाही लाभार्थ्याला घरकुल मंजूर करण्यात आलेले नाही. येत्या १५ मार्चपर्यंत लाभार्थींना घरकुल ...

नंदुरबार - तालुक्यातील उमर्दे गावात २०११पासून आजतागायत एकाही लाभार्थ्याला घरकुल मंजूर करण्यात आलेले नाही. येत्या १५ मार्चपर्यंत लाभार्थींना घरकुल न दिल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष गुलाब महारु मराठे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

उमर्दे गावातील लाभार्थींना २०११पासून आजवर ‘प्रधानमंत्री आवास योजनें’तर्गत एकही घरकुल मंजूर झालेले नाही. अनेकदा पाठपुरावा केल्यानंतरही कोणीही याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे येथील लाभार्थी मोठ्या प्रमाणावर घरकुलांपासून वंचित राहिले आहेत. गावाची लोकसंख्या साडेतीन ते साडेचार हजार आहे. आवास योजनेचे लाभार्थी येथे आहेत. मात्र, त्यानंतरही कार्यवाही करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शासनाने घरकुल मंजूर करण्याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास १५ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे मराठे यांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर गुलाब मराठे, कैलास रामा भिल, रविन भावराव बांडे, नामदेव शिवदास पेटकर, मुकेश गांगरे, राजू दामू बांडे यांच्या सह्या आहेत.