शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाचा इशारा देणा:या ग्राहकांना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील टॉवरच्या माध्यमातून नागरिकांना योग्य सेवेऐवजी खर्च करुनही समस्यांनाच तोंड द्यावे लागत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील टॉवरच्या माध्यमातून नागरिकांना योग्य सेवेऐवजी खर्च करुनही समस्यांनाच तोंड द्यावे लागत आहे. असे म्हणत तेथील ग्राहकांनी मोलगी भागातील चारही टॉवर जाळून होळी करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे निवेदनकत्र्याना मोलगी पोलीस ठाण्यामार्फत नोटीसा बजावण्यात आल्या आहे. परंतु तातडीने सेवा सुरळीत न झाल्यास होळी करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले जात आहे.दुर्गम भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी दूरसंचार विभागामार्फत मोलगी, जमाना, सरी व वेली या ठिकाणी उभारण्यात आलेले टॉवर वारंवार बंद पडतात. त्यामुळे  मोबाईल धारकांना योग्य सेवा मिळत नाही. हा प्रकारमागील दोन वर्षापासून सुरू  असून परिसरातील लाखो ग्राहक  त्रस्त झाले आहे. त्यांना या खंडीत सेवेमुळे संपर्काच्या सुविधा मिळत नाही. तर सद्यस्थितीत शासनामार्फत बहुतांश शासकीय व खाजगी कामे ऑनलाईन करण्यात आली  असल्याने दुर्गम भागातील ऑनलाईन सेवा सर्वस्वी बीएसएनएलवर आधारित आहे. त्यामुळे सर्व ऑनलाईन कामेही याच नेटकर्ववर आधारित आहे. परंतु अशा खंडीत व अविश्वसनीय सेवेमुळे सर्वमान्य नागरिकांसह अधिकारी व कर्मचा:यांची ऑनलाईन कामे    रखडत आहे. विविध बँका, मिनी बँका व शासकीय कार्यालयातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. याबाबत मोबाईलधारकांमध्ये   नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सेतू केंद्रासह तलाठींकडून मिळणारे विविध ऑनलाईन दाखल्यांसह  अन्य कामांसाठी नागरिकांना फे:या माराव्या लागत आहेत. बीएसएनएलच्या या सेवेला कंटाळलेल्या संतप्त पोलीस प्रशासनाकडे निवेदन दिले. त्यातून सहन कराव्या लागणा:या समस्या निदर्शनास आणून देत सेवा सुरळीत न झाल्यास काही दिवासांनी टॉवरची होळी करण्यात येणार असल्याचा इशारा दोन दिवासांपूर्वी नागरिकांमार्फत देण्यात आला   होता.निवेदन देणा:या नागरिकांना मोलगी पोलीस ठाण्यामार्फत सहा जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहे. त्यात जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सी.के.पाडवी, मोलगीचे माजी सरपंच शितल पाडवी, काठीचे सरपंच स्नेहा पाडवी, माजी सरपंच पृथ्वीसिंग तडवी, धिरसिंग वसावे रा.सरी व अॅड. सरदारसिंग वसावे यांचा समावेश आहे. परंतु आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून तातडीने सेवा सुरळीत न झाल्यास चारही टॉवरची होळी करण्यासाठी चारा व लाकुडफाटा गोळा केल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात आले.

अक्कलकुवा तालुक्यातील जमाना येथेही बीएसएनएलमार्फत टॉवर उभारण्यात आला आहे. या टॉवरमुळे त्या भागातील अनेक गावांमधील नागरिकांची सोय होत होती. परंतु सहा महिन्यांपासून हा टॉवरच बंद झाला आहे, त्यामुळे शोकांतिका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्या परिसराती नागरिकांना बीएसएनएलच्या सेवेऐवजी समस्यांनाच अधिक तोंड द्यावे लागत आहे. नेटवर्कच मिळत नसल्यामुळे 108 रुग्णवाहिका सेवा देखील रुग्णांसाठी उपल्बध होऊ शकत नाही.धडगाव तालुक्यातील टॉवरची देखील अशीच परिस्थिती असल्याचे वारंवार ग्राहकांकडून तक्रारी करण्यात आल्या असून आजही खंडीत सेवा मिळत आहेत. त्यामुळे दुर्गम भागाकडे दुरसंचार विभाग दुजाभावानेच पाहत असल्याचे म्हटले जात आहे.