तिसऱ्या दिवशीही आरटीपीसीआर टेस्टिंग किटची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST2021-04-06T04:29:12+5:302021-04-06T04:29:12+5:30

नवापूर तालुक्यातील रुग्णालयात सलग तिसऱ्या दिवशी आरटीपीसीआर किट उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना रॅपिड अँटिजन तपासणी करावी लागत आहे. ...

Waiting for the third day RTPCR testing kit | तिसऱ्या दिवशीही आरटीपीसीआर टेस्टिंग किटची प्रतीक्षाच

तिसऱ्या दिवशीही आरटीपीसीआर टेस्टिंग किटची प्रतीक्षाच

नवापूर तालुक्यातील रुग्णालयात सलग तिसऱ्या दिवशी आरटीपीसीआर किट उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना रॅपिड अँटिजन तपासणी करावी लागत आहे. तालुक्यात तीन ठिकाणी रॅपिड अँटिजन तपासणी शिबिर लावण्यात आले आहे. पहिले शिबिर नवापूर सीमा तपासणी नाक्यावर लाण्यात आले असून, वाहनचालक व प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. दुसरे शिबिर कोंडाईबारी घाटात लावण्यात आले आहे. तिसरे रॅपिड शिबिर महाविद्यालयात लावण्यात आले आहे. या शिबिरात आतापर्यंत १८० जणांची तपासणी झाली असून, यात २४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. नवापूर तालुक्यात कोरोना संक्रमण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तालुक्यात जास्तीत जास्त तपासणी करण्याची गरज आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने कोरोना तपासणी करण्यासाठीचे साहित्य खरेदीचे नियोजन करून तालुक्यात आरोग्यसुविधा पुरविण्याची गरज आहे. मात्र, आरोग्य विभागातील नियोजनाचा अभाव यात दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनता कोरोना संकटात सापडली असून, याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Waiting for the third day RTPCR testing kit