‘कुंडलेश्वर’ पर्यटनस्थळाला विकासकामांची प्रतिक्षा

By Admin | Updated: April 14, 2017 16:13 IST2017-04-14T15:35:19+5:302017-04-14T16:13:45+5:30

कुंडलेश्वर येथे पर्यटन विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आह़े या ठिकाणी पर्यटकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आह़े

Waiting for development works at 'Kundleshwar' tourist resort | ‘कुंडलेश्वर’ पर्यटनस्थळाला विकासकामांची प्रतिक्षा

‘कुंडलेश्वर’ पर्यटनस्थळाला विकासकामांची प्रतिक्षा

सोमावल, दि.14-तळोदा तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी तसेच पर्यटन स्थळ असलेल्या कुंडलेश्वर येथे पर्यटन विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आह़े या ठिकाणी पर्यटकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आह़े

कुंडलेश्वर हे तालुक्यातून जाणा:या ब:हाणपुर-अंकलेश्वर महामार्गाच्या उत्तरेस सातपुडय़ाच्या पायथ्याशी अक्कलकुवा तालुक्याच्या सिमेला लागून आह़े या ठिकाणी जाण्यासाठी महामार्गावरील शिव्रे गावावरुन रस्त्याने जाता येत़े येथे प्राचीन महादेव मंदिर, बारमाही वाहणारा गरम पाण्याचा झरा तसेच चोहोबाजूंनी वेढलेल्या विविध औषधी गुणधर्म असलेल्या वृक्ष, वेली आह़े त्यामुळे येथे पर्यटक तसेच भाविकांचा ओढा मोठय़ा संख्येने असतो़
या ठिकाणी असलेले प्राचीन महादेव मंदिर व गरम पाण्याचा झरा पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आह़े परंतु याकडे पर्यटन विभागाने अधिक लक्ष दिल्यास आहे त्या पेक्षा अधिक चांगल्या पध्दतीने हे पर्यटन स्थळ भविष्यात समोर येवू शकेल अशी अपेक्षा पर्यटकांकडून करण्यात येत आह़े 
या ठिकाणी वर्षभर भाविक तसेच पर्यटक भेट देत असतात़ परंतु पुरेशा पायाभूूत सुविधा नसल्याने येथे काहीसा नाराजीचा सुर उमटताना दिसून येत आह़े येथे येण्यासाठी असलेल्या रस्त्यांची मोठय़ा प्रमाणात दुरावस्था झाली आह़े वाहन चालविण्यासाठीही वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आह़े या परिसरात जाण्यासाठी असलेला सुमारे 2 किमीच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी टाकीचे बांधकामदेखील अपूर्ण आह़े पर्यटन विभागाने या पर्यटन तसेच धार्मिक क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आह़े
(वार्ताहर)

Web Title: Waiting for development works at 'Kundleshwar' tourist resort