शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शहादा आगारातील बसेसवर व्हीटीएस यंत्रणा, बसस्थानकातील डिस्प्ले बोर्ड देणार प्रवाशांना माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

भारतीय रेल्वेच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी व्हीटीएस यंत्रणा कार्यान्वित करीत आहे. ही यंत्रणा बसविल्यानंतर प्रवाशांना संबंधित बस ...

भारतीय रेल्वेच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी व्हीटीएस यंत्रणा कार्यान्वित करीत आहे. ही यंत्रणा बसविल्यानंतर प्रवाशांना संबंधित बस कोणत्या भागातून धावत आहे, तिचे शेवटचे लोकेशन काय होते, संबंधित बसस्थानकावर येण्यास किती वेळ लागणार आहे. तसेच ती आता कोणत्या ठिकाणी धावत आहे. त्या ठिकाणापासून बसस्थानकात येण्यासाठी किती वेळ लागणार तसेच सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळ प्रवाशांना समजण्यास मदत होणार आहे.

एस.टी. बस म्हटली तर रस्त्यात काही तांत्रिक अडचण आली म्हणजे प्रवाशांना खूपच वेळ बसस्थानकात बसून संबंधित बसची वाट पहावी लागत होती. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात होता. मात्र आता एसटीने ही यंत्रणा लावून प्रवाशांच्या सोयीचे केले आहे. आपल्याला पाहिजे असलेली संबंधित बस यावेळी कुठे आहे व कधी पोहोचणार आहे याची योग्य माहिती प्रवाशांना आता या डिस्प्ले बोर्डच्या माध्यमातून मिळणार आहे. एसटीने बसविलेल्या या यंत्रणेचा प्रवाशांना फायदा होणार असून प्रवाशांनी एसटीचे आभार मानले आहेत.

बसस्थानकात लागले स्क्रीन

शहादा आगारातील कंट्रोल केबिनच्या बाजूला डिस्प्ले बोर्ड लावण्यात आले आहे. डिस्प्ले बोर्डच्या माध्यमातून कुठली बस कुठल्या मार्गावर धावत असून ती किती वेळेत बसस्थानकात येणार आहे याची माहिती मिळणे सोईचे होईल. बस सुटण्याची व पोहोचण्याची वेळ निश्चित असते ती वेळ प्रवाशांना या बोर्डाच्या माध्यमातून समजणार आहेत. बसचा अपघात झाल्यास त्याची माहिती व्हीटीएस यंत्रणेमुळे तात्काळ कळणार असल्याने आवश्यक ती मदत अपघातस्थळी येणे शक्य होणार आहे.

एस.टी. बसेसवर असणार अधिकाऱ्यांचे लक्ष

एसटीने नेमून दिलेल्या अधिकृत थांब्यावर बस न थांबल्यास त्याची माहिती महामंडळाला कळणार असून त्यामुळे संबंधित चालक किंवा वाहकावर कारवाई करणे शक्य होणार आहे.

यापुढे सर्व चालकांना नेमून दिलेल्या बसस्थानकांवर बस घेऊन थांबावेच लागणार आहे.

बस सध्या कुठल्या मार्गावर धावत आहे. तेथून बसस्थानकात यायला किती अवधी आहे. असा उशीर झाला तर त्याची माहिती प्रवाशांना मिळणार असून चालक वेळकाढूपणा करीत असेल तर कारवाई करता येणार आहे.

बसफेऱ्या व वेळापत्रक सुधारणार

एसटी बसस्थानकात येण्यामागची कारणे अनेक असतात याचा परिणाम अन्य बस फेऱ्यांवर होत असतो.

एसटीचे वेळापत्रक सुधारावे व बसची सद्यस्थिती प्रवाशांना कळावी यासाठी व्हीटीएस प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

एखादी बस नादुरुस्त झाल्यास पुढील बसफे-यांवर त्याचा परिणाम होतो. मात्र आता ती माहिती काढून पुढील फेरीसाठी नवीन बस उपलब्ध करण्यात येणार आहे.

व्हीटीएस प्रणालीमुळे प्रवाशांना एस.टी. बस नेमकी कुठे आहे त्याची माहिती कळावी यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. शहादा आगारात डिस्प्ले बोर्ड बसविण्यात आला असून त्याठिकाणी सर्व बसफेऱ्यांची माहिती उपलब्ध होणार आहे.

योगेश लिंगायत, आगारप्रमुख, शहादा

एसटीने सुरू केलेली व्हीटीएस यंत्रणा अतिशय सुंदर कल्पना असून याचा प्रवाशांना मोठा फायदा होऊन त्यांचा वेळ वाचणार आहे. या यंत्रणेमुळे कोणती बस कुठे आहे व ती कधी येणार हे प्रवाशांना डिस्प्ले बोर्डच्या माध्यमातून बघता येणार आहे.

प्रा. दत्ता वाघ, अध्यक्ष प्रवासी संघटना, शहादा