शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवरील गावांमध्ये ‘लॉकडाऊनला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : कोरोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे़ या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवरील खेतिया आणि खेडदिगर ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : कोरोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे़ या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवरील खेतिया आणि खेडदिगर या दोन्ही गावांमधील नागरिक घरीच राहणे पसंत करत असल्याने ऐरवी असणारा सीमावर्ती भागात शुकशुकाट पसरला आहे़गुरुवारी सकाळपासून खेतिया शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीसांनी चांगलेच धारेवर धरत त्यांच्यावर कारवाई केली़ जागोजागी घोळका करुन बसणारे तसेच पोलीसांना हुलकावणी देत पळ काढणाऱ्यांवर कारवाई करत त्यांना लाठी मार दिला़ यात पोलीसांनी नियम मोडणाºयांच्या हाती ‘मी ह्या देशाचा व समाजाचा दुश्मन असून मी घरी बसणार नाही’ असे पोस्टर देत त्यांच्याकडून उठबशा काढून घेत शिक्षा केली़ शहरात अनेक ठिकाणी व रस्त्यावर नागरिक मोटरसाइकल ने फिरतांना आढळून आल्यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी ही कारवाई केली़ दरम्यान खेतिया येथील बँकांमध्ये विविध सूचना करण्यात येत असून एकावेळी एकास ग्राहकाला आतील भागात प्रवेश दिला जात आहे़खेतिया शहरात सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेत, दुध यांची विक्री करण्यात येत आहे़ नागरिकांनी एकमेकांपासून अंतर ठेवून उभे राहावे व मास्क सैनिटाइजर चा वापर करावा असे पालिका प्रशासनाने कळवले आहे़ प्रांताधिकारी सुमेरसिंह मुजाल्दे, तहसीलदार राकेश सत्या हे सतत दौरे करीत असून त्यांना सूचना देत आहेत.खेतिया शहरात करण्यात येणाºया उपाययोजनांबाबत माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वर महाले यांनी सांगितले की, शहरात दररोज औषधांची फवारणी करण्यात येत असून साफ सफाई करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक सेवाभावी नागरिकांची मदत करत आहेत़महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सिमेवरील खेतिया आणि खेडदिगर या दोन्ही गावांच्या हद्दीत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश पोलीस प्रशासनाचे पथक, आरोग्य विभागाचे पथक, नगरपालिका, ग्रामपंचात कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ सिमा ओलांडू पाहणाºयांना त्यांच्याकडून अटकाव करण्यात येत आहे़ दोन्ही राज्यात संचारबंदी असल्याने या सिमा सील करण्यात आल्या आहेत़ दरम्यान दोन्ही गावांमध्ये बाहेरगावाहून येणाºयांना आधी तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात पाठवण्यात येत आहे़ याठिकाणी तपासणी पूर्ण करण्यात आल्यानंतर बाहेर सोडण्यात येत आहे़