शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण वाढल्याने ग्रामस्थ धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तोरखेडा : शहादा तालुक्यातील तोरखेडा गावातील ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने गावात उपाययोजना करण्यात आल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कतोरखेडा : शहादा तालुक्यातील तोरखेडा गावातील ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने गावात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या रुग्णाच्या अतिसंपर्कातील १३ जणांना शहादा येथेल विलागीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. पैकी ७८ वर्षीय पुरुषाचे उपचार सुरू असताना निधन झाले. या महिला रुग्णाच्या संपर्कातील मयत पुरुषासह सहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत.तोरखेडा गावातील महिला रुग्णाला कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने गावात खबरदारीच्या उपाययोजनांसह गाव कटेनमेंट झोन क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.तोरखेडा गावाच्या सीमा व गावात येणारे रस्ते बॅरिकेट लावून बंद करण्यात आल्या आहेत. जवळील हिंगणी, दोंदवाडे, फेस ही गावे बफर झोनमध्ये आहेत. बफर झोनमधील हिंगणी गावातही ४९ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तेथील १३ लोकांना विलगीकक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालांपैकी तोरखेडा येथील महिला रुग्णाच्या संपर्कातील सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात नंदुरबार येथे उपचार सुरू असताना १ जुलै रोजी मृत्यू झालेल्या वृद्धाचाही समावेश आहे.तोरखेडा गावात ग्रामपंचायतीमार्फत निर्जंतुकीकरण करण्यात आले असून लॉकडाऊचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.