शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनावरून जाहीर प्रचार न करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : वाहनावरून जाहीर प्रचार न करण्याचा व गावकऱ्यांची एकाचवेळी उमेदवाराने भेटी घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : वाहनावरून जाहीर प्रचार न करण्याचा व गावकऱ्यांची एकाचवेळी उमेदवाराने भेटी घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या भरडू गटातील पाच गावांनी घेतला आहे. निवडणुकीतील खर्चास या निर्णयामुळे लगाम बसणार आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १० व पंचायत समितीच्या २० गणांसाठी निवडणुकीची धामधुम सुरू आहे. ग्रामीण भागात या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी उमेदवारांकडून आवश्यक कागदपत्रे व शपथपत्रे आदीं बाबत तयारी सुरू असल्याने व त्यातच पहिल्यांदा आॅनलाईन नामांकन दाखल करावे लागणार असल्याने त्यातील बारकावे पाहता नामांकन दाखल होऊ शकलेले नाही. सोमवारी ही प्रक्रिया जोर धरेल अशी शक्यता आहे.निवडणुक म्हटली की, प्रचार यंत्रणा, वाहने, प्रचार पत्रक, जाहीरनामा व त्या अनुषंगाने उमेदवारावर खर्चाची जबाबदारी येते. प्रचारासाठी राबणाºया हातांची काळजी घेणेही उमेदवारास क्रमप्राप्त ठरते. तालुक्यातील सर्वच्या सर्व १० गट व २० गण अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. भरडू गट अनुसूचित जमाती सर्वसाधारण असून, त्यातील भरडू व वडफळी हे दोन्ही गण अनुसूचित जमाती महिला राखीव आहेत. गटात भरडू, महालकडू, केलपाडा, सोनारेदिगर, शेतगाव, भांगरपाडा, खर्जे, तारपाडा, मोठे कडवान, लहान कडवान, वडफळी, तारापूर, डोगेगाव, वहांदे, जामदा, अंजने व बिलदा या गावांचा समावेश आहे. यातील तारपाडा, बिलदा, जामदा, डोगेगाव व अंजने या पाच गावातील बहुसंख्यक ग्रामस्थांनी निवडणूक खर्चास फाटा देण्याबाबत सहमती दर्शविली आहे. वाहनांमधून होणारा प्रचार पाहता गटातील प्रत्येक गावी फिरण्यासाठी वाहने व कार्यकर्ते यांच्यावर उमेदवारास खर्च करावे लागते. ग्रामीण भागात शेतकामांना सकाळी लवकर सुरूवात होते व दुपार पावेतो ही कामे चालतात. गावात सहसा या कालावधीत शुकशुकाटच असतो. अश्या काळात वाहनांमधून होणारा प्रचार फारसा परिणामकारक ठरत नाही. त्याऐवजी ग्रामस्थांची हाऊस टु हाऊस प्रत्यक्ष भेट व्हावी किंवा एकत्रितपणे कॉर्नर सभेच्या माध्यमातून लोकांना उमेदवारास भेटता यावे असे शक्य असल्याने या पाच गावांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे. गटातील इतर गावे व तालुक्यातील इतर गटांनीही असा आदर्श घेतल्यास ग्रामीण भागातील प्रचाराचे स्वरुपच बदलतील अशी शक्यता आहे.