शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
4
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
5
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
6
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
7
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
8
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
9
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
10
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
11
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
12
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
13
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
14
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
15
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
16
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
17
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
18
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
19
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
20
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘रॅन्समवेअर’च्या धास्तीने नंदुरबार जिल्हा प्रशासन, बँकांमध्ये सतर्कता

By admin | Updated: May 15, 2017 18:18 IST

शासकीय कार्यालयांसह बँकांमध्येही विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 15 -  सायबर हल्ल्याची चर्चा आणि त्यासंदर्भात फिरणारे मेसेज लक्षात घेता नंदुरबार येथे शासकीय कार्यालयांसह बँकांमध्येही विशेष दक्षता घेण्यात येत आहे.  जिल्हा प्रशासनाच्या सर्व संगणक प्रणालींचे नियंत्रण जिल्हा सूचना व विज्ञान कार्यालयातून करण्यात येत आहे. याशिवाय सर्व संबधित कार्यालयांनाही सूचना देण्यात आल्या. शहरातील निम्मे एटीएमदेखील बंद होते.   
सायबर हल्ल्यासंदर्भात सोमवारी आलेल्या बातम्या आणि सोशल मीडियावर फिरणारे मेसेज यामुळे लोकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.   आठवडय़ाचा पहिला दिवस ंअसूनही एटीएममध्ये शुकशुकाट  दिसून आला. याशिवाय जिल्हा प्रशासनाच्या सर्वच कार्यालयांमध्ये देखील याबाबत सतर्कता बाळगण्यात आली होती.
  जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांच्या संगणक प्रणालींचे नियंत्रण हे जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी कार्यालयाअंतर्गत   करण्यात येते. अधिकारी धर्मेद्र जैन यांनी याबाबत सोमवारी सकाळीच   सर्व विभाग प्रमुखांना सुचीत करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनीदेखील याबाबत जैन यांच्याकडून माहिती जाणून घेतली. सर्व विभागातील संगनकांमधील अॅण्टी व्हायरस दुपार्पयत अपडेट करण्यात आले.याशिवाय विना नावाचा आणि माहितीचा मेल आला असल्यास तो ओपन करू नये. नवीन वेबसाईट देखील ओपन करण्याचे काही दिवस टाळावे. अनोळखी मेल ओपन केला     गेल्यास काही अडचणी आल्यास तात्काळ जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा असेही आवाहन धर्मेद्र जैन यांनी केले आहे.
सायबर सेलही सतर्क
जिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेललाही सतर्क करण्यात आले    आहे. अशा प्रकारची तक्रार  कुणाकडून आल्यास तात्काळ त्याची माहिती जिल्हा सुचना व विज्ञान कार्यालयात कळविण्याचे सांगण्यात आले आहे.
बँकांचे सॉप्टवेअर अपडेट
स्टेट बँकेचे सॉप्टवेअर वेळोवेळी अपडेट करण्यात येत असल्यामुळे रॅन्समवेअरचा धोका नसल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली. असे असले तरी सर्व संबधितांना काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. स्टेट बँकेचे एटीएम देखील सुरळीत सुरू होते. इतर सर्वच बँकांमधील व्यवहार देखील ऑनलाईन सुरळीत सुरू होते. परंतु आयडीबीआय, बँक ऑफ इंडिया, अॅक्सीस बँक, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँकेचे एटीएम दुपारनंतर बंद दिसून आले. जे एटीएम सुरू होते. त्या ठिकाणी फारशी गर्दी दिसून येत नव्हती.