शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

रेडझोनमधील वाहनधारकांना प्रतिबंध हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : रेडझोनमधील वाहने वाळू भरण्यासाठी बंदी असतानाही प्रकाशा येथील पेट्रोल पंप व प्रकाशा-तळोदा रस्त्यावर दुपारपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : रेडझोनमधील वाहने वाळू भरण्यासाठी बंदी असतानाही प्रकाशा येथील पेट्रोल पंप व प्रकाशा-तळोदा रस्त्यावर दुपारपासून तर रात्रीपर्यंत शेकडो वाहनांची रांग लागते. या वाहन चालकांच्या तोंडाला मास्क नाही, सोशल डिस्टनसिंग नाही, पान-गुटखा खाऊन तेथेच थुंकतात. या प्रकारामुळे प्रकाशा गावाला कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. या वाहनांवर पोलीस व महसूल विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.सविस्तर वृत्त असे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्यातील व रेडझोन जिल्ह्यातील वाहनांना बंदी घातली आहे. मात्र आपल्याच राज्यातील रेडझोनमधील वाहने थेट प्रकाशा येथे गुजरातमधील वाळू भरण्यासाठी दाखल होत आहेत. दुपारी बारा ते रात्रीपर्यंत शेकडो वाळू वाहणारी ट्रक, डंपर ही वाहने एकामागून एक जमा होतात आणि रात्री गुजरात हद्दीमध्ये जाऊन वाळू भरून पहाटे सुसाट निघतात. महाराष्टÑाच्या हद्दीजवळील गुजरातमधील यावल, सावळदा, भमसाळ, देवळा आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा केला असून दुरुन हा साठा म्हणजे डोंगर आहे की काय असे दिसते. येथील वाळूला मोठी मागणी असल्याने कोरोनाच्या रेडझोनमधील पुणे, मुंबई, दादर, नाशिक, ठाणे, जळगाव, चोपडा, धुळे, शिरपूर येथून ही सर्व वाहने वाळू भरण्यासाठी प्रकाशा येथे दुपारपासूनच गर्दी करतात. प्रकाशा येथील पेट्रोल पंप, रस्त्यावर, प्रकाशा ते तळोदा रस्त्यावर आदी ठिकाणी ते थांबतात. या वाहनांच्या चालक व क्लीनर यांच्या तोंडाला मास्क नसतो, गुटखा-तंबाखू खाऊन तेथेच थुंकतात. रात्र झाली की गुजरातकडे जातात आणि तेथून वाहनात वाळू भरून रात्रीच्या रात्री प्रसार होतात.जिल्ह्याबाहेरील वाहनांना प्रवेशबंदी असतानाही रेडझोनमधील वाहने प्रकाशा येथे का थांबतात? यामुळे प्रकाशा ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. या वाहनांमुळे कोरोनाचा प्रसार होऊन प्रकाशा ग्रामस्थांसाठी ते धोकेदायक ठरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व बाबींची खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच दखल घेऊन रेडझोनमधील एकही वाहन प्रकाशा हद्दीत थांबल्यास त्याचावर पोलीस, महसूल विभागाने कारवाई करावी, अशी मागणी प्रकाशा ग्रामस्थांकडून होत आहे.