अक्कलकुवा महाविद्यालयात विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST2021-03-16T04:31:22+5:302021-03-16T04:31:22+5:30

अक्कलकुवा : येथील आर. एफ. एन. एस. वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी ...

Various programs at Akkalkuwa College | अक्कलकुवा महाविद्यालयात विविध कार्यक्रम

अक्कलकुवा महाविद्यालयात विविध कार्यक्रम

अक्कलकुवा : येथील आर. एफ. एन. एस. वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उमा शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या सहाय्यक प्रा. सविता शिवाजी दूधभाते उपस्थित होत्या. प्रा. दूधभाते यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासाच्या लढ्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी, जिल्हा समन्वयक डॉ. माधव कदम, डॉ. बी. एस. पाटील, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. भरत एन. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद राघोजी जोगदंड, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यापीठाच्या सूचनेचे पालन करून कार्यक्रमाला प्रा. गोटू सूर्यवंशी, नारायण पाटील, अंकुश ठाकरे यांनी सहभाग नोंदवला.

Web Title: Various programs at Akkalkuwa College