शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू, जिल्ह्यात १० केंद्रांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST

ऑनलाईन नोंदणीप्रमाणे केंद्रात जाऊन देखील नोंदणी करण्याची मुभा असल्याने नागरिकांसाठी ते सुटसुटीत झाले आहे. शनिवारपासून या वयोगटासाठी लसीकरण केले ...

ऑनलाईन नोंदणीप्रमाणे केंद्रात जाऊन देखील नोंदणी करण्याची मुभा असल्याने नागरिकांसाठी ते सुटसुटीत झाले आहे. शनिवारपासून या वयोगटासाठी लसीकरण केले जाणार असल्याची माहिती बऱ्याच जणांना नव्हती. त्यामुळे काही केंद्रांवर शुकशुकाट होता तर काही केंद्रांवर सकाळी ११ वाजेनंतर रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण तीन लाख ४६ हजार जणांचे लसीकरण झाले असून त्याची टक्केवारी जवळपास २३ टक्क्यांपर्यंत गेली आहे. किमान ५० टक्के नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत. १५ हजार ५०० पेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. फ्रंटलाईन वर्कर असलेल्या ३९ हजार १८० जणांनी, १८ ते ४४ वयोगटातील १४ हजार २८९ जणांनी तर ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील दोन लाख २१हजार ८४२ जणांनी लस घेतली आहे.

शहरी भागात अनेकजण लस घेण्यास पुढे येत नसल्याची स्थिती आहे. त्यासाठी विविध पातळीवर जनजागृती केली जात आहे, परंतु उपयोग होत नाही. दुर्गम भागात देखील पूर्वी ही स्थिती होती, परंतु जनजागृतीच्या माध्यमातून संबंधितांचे मतपरिवर्तन केले गेल्याने दुर्गम भागात देखील लसीकरणाला वेग आलेला आहे. पावसाळा संपेपर्यंत किमान ५० ते ६० टक्के जणांचे लसीकरण व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहे.