पुसनद येथे लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST2021-05-17T04:29:11+5:302021-05-17T04:29:11+5:30

लसीकरणासाठी पुसनद गावात ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, जि. प. शाळेचे शिक्षक, अंगणवाडी व आशा सेविका यांनी घरोघरी जाऊन जनजागृती ...

Vaccination camp at Pusanad | पुसनद येथे लसीकरण शिबिर

पुसनद येथे लसीकरण शिबिर

लसीकरणासाठी पुसनद गावात ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, जि. प. शाळेचे शिक्षक, अंगणवाडी व आशा सेविका यांनी घरोघरी जाऊन जनजागृती करून लसीकरण घेण्यासाठी नोंदणी केली होती. शिबिराचे उद्घाटन सरपंच अनिल एकनाथ आगळे व पोलीस पाटील कृष्णा तुकाराम कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी. एम. पाटील, परिचारिका कृतिका पावरा, आरोग्य सेवक योगेश ठाकूर, के. एस. ठाकरे यांनी लसीकरण केले. सरपंच अनिल एकनाथ आगळे, उपसरपंच दिव्या प्रवीण चौधरी, पोलीस पाटील कृष्णा तुकाराम कोळी, महेंद्र गोविंदसिंग गिरासे, दुर्योधन शरद वाघ, माजी सरपंच प्रवीण जगन्नाथ चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सखाराम लक्ष्‍मण भिल, संगीता पंडित भिल, शरद बाबू वाघ, दिलीप सना भिल, कविता गणेश मुसळदे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक मोसमी जैन, शिक्षक मराठे, चेतन आगळे, आदींनी सहकार्य केले.

Web Title: Vaccination camp at Pusanad