चिमणीपाडा येथे लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST2021-05-13T04:30:45+5:302021-05-13T04:30:45+5:30

जिल्हा परिषद शाळा चिमणीपाडाच्या परिसरात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले ,शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, केंद्रप्रमुख सुभाषचंद्र ...

Vaccination camp at Chimanipada | चिमणीपाडा येथे लसीकरण शिबिर

चिमणीपाडा येथे लसीकरण शिबिर

जिल्हा परिषद शाळा चिमणीपाडाच्या परिसरात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले ,शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, केंद्रप्रमुख सुभाषचंद्र पाटील, सरपंच कांतीलाल गावित, ग्रामसेवक प्रवीण तावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप गावीत, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश वळवी, डॉ. सखाराम वळवी ,डॉ. प्रीती पाडवी, डॉ. स्मिता पाडवी ,डॉ. अन्सारी उपस्थित होते .

शिबिरापूर्वी गत पंधरवड्यापासून प्राथमिक शिक्षक कांचनमाला पाटील, सोमनाथ गावीत, सविता शिंदे, विजया वसावे ,अनिल काकुस्ते, मीरा देवरे, राजू गावित, सुनील सोनवणे, आरोग्य सहाय्यक राजेंद्र परदेशी ,वसंत पाडवी, आरोग्य सेविका बेबी गुळवे,आशा वळवी, संदीपा वसावे ,रंजना वसावे, अंगणवाडी सेविका छाया वसावे, आशा वर्कर आमीरा गावीत, नमिता पाडवी ,इंदिरा वळवी, कोकिला वसावे,बेबी गावीत,इंदु वळवी आदींनी चिमणीपाड़ा,अम्बाफली, व शेगवे या गावातील प्रत्येक घरी भेट देऊन ४५ वर्ष व त्यावरील नागरिकांना लस घेतल्याने होणारे फायदे समजावून सांगितले. त्यामुळे शिबिरात सामाजिक अंतर ठेवून लसीकरणासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Vaccination camp at Chimanipada