विखरणला दुसऱ्या टप्प्यात १६३ जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:29 IST2021-05-23T04:29:27+5:302021-05-23T04:29:27+5:30

यावेळी सरपंच छायाबाई बापू पाटील, ग्रामसेवक एस.डी. गायकवाड, लहान शहादे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज कदम, पोलीस ...

Vaccination of 163 people in the second phase | विखरणला दुसऱ्या टप्प्यात १६३ जणांचे लसीकरण

विखरणला दुसऱ्या टप्प्यात १६३ जणांचे लसीकरण

यावेळी सरपंच छायाबाई बापू पाटील, ग्रामसेवक एस.डी. गायकवाड, लहान शहादे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज कदम, पोलीस पाटील दीपमाला पाटील, ग्रामपंचायत सदस्य, रोहिदास मराठे, बापू पाटील, देवरे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी‌. साळुंके व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत विखरण, श्री.आप्पासो. आ. ध. देवरे माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा विखरण यांच्या संयुक्त दुसऱ्या टप्प्यातील शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लसीकरण मोहिमेंतर्गत शिक्षकांनी केलेल्या नोंदणीने दुसरा डोस घेण्यासाठी गावातील नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवला. लहान शहादे आरोग्य केंद्राच्या परिचारिका रेखा बाविस्कर, जयश्री कानडे, कल्पना गोसावी, आरोग्य सेवक पी.जी. ब्राम्हे, हीना वळवी, गटप्रवर्तक सरला अहिरे यांनी लसीकरण केले. लसीकरण मोहिमेसाठी विखरण गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, देवरे विद्यालयाचे शिक्षक के.पी. देवरे, डी.बी. भारती, एम.डी. नेरकर, वाय.डी. बागूल, आर.एम. पाटील, एस.जी. पाटील, एम.आर. भामरे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक एस.एस. बोरसे, जयश्री सैंदाणे, आशा कार्यकर्ती माधुरी पाटील, रत्‍नाबाई पाटील, राहुल पाटील, विनोद कुंभार, जल सुरक्षक महादू भील, विलास भील आदींनी सहकार्य केले.

Web Title: Vaccination of 163 people in the second phase