शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी १०० जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST

कोठार : तळोदा तालुक्यातील धवळीविहीर येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण शिबिरात एकाच दिवशी तब्बल १०० जणांनी उस्फूर्तपणे लसीकरण ...

कोठार : तळोदा तालुक्यातील धवळीविहीर येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण शिबिरात एकाच दिवशी तब्बल १०० जणांनी उस्फूर्तपणे लसीकरण केले. सुंतूबाई गणपत पावरा या ८५ वर्षीय महिलेला लस देऊन लसीकरणाची सुरुवात करण्यात आली.

धवळीविहिर येथील लसीकरण शिबिरात सोमावल आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व व लसीकरणाबाबत असणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, गैरसमज दूर करण्यासाठी माहिती दिली. या शिबिरात गावातील १०० महिला व पुरुष यांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करण्यासाठी हजेरी लावत लसीकरण करून घेतले. याप्रसंगी डॉ. सुधीर ठाकरे व त्यांचे संपूर्ण आरोग्य विभागाचे कर्मचारी, मुख्याध्यापक प्रताप वळवी व सर्व कर्मचारी वृंद, पोलीस पाटील हिरालाल पावरा, तंटामुक्त समिती अध्यक्ष रायसिंग परमार, सुभाष पावरा, कांतीलाल पटले, मुकेश कापुरे, ॲड. दारासिंग पावरा, ग्रामसेवक हारसिंग पावरा, सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, नागेश पावरा, वसंत पावर, दिनेश पावरा, अनिल परमार आदींनी सहकार्य केले.

आठवडाभर शिबिर घेण्याची ग्रामस्थांची मागणी

धवळीविहिर हे तळोदा तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले गाव आहे. गावात पहिल्या दिवशी तब्बल १०० जणांनी लसीकरण करून एक आदर्श निर्माण करून दिला आहे. लसीकरणाचे कोणत्याही प्रकारचे तोटे नसून लोकांनी उस्फूर्तपणे लसीकरण करावे हाच संदेश धवळीविहीरकरांनी या लसीकरण शिबिरातून दिला आहे.

धवळीविहीर गावाची लोकसंख्या तीन हजाराच्या जवळपास असून संपूर्ण गावाचे १०० टक्के लसीकरण करण्यासाठी प्रशासनाने सलग आठवडाभर लसीकरण शिबिर आयोजित करावे, अशी धवळीविहीर ग्रामस्थांची मागणी आहे.