शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरकार्य व साखरपुडा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी तालुक्यातील मोदलपाडा गावदेखील पुढे सरसावले आहे. नागरिकांचा समुदाय एकत्र येऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी तालुक्यातील मोदलपाडा गावदेखील पुढे सरसावले आहे. नागरिकांचा समुदाय एकत्र येऊ नये म्हणून ग्रामस्थांनी नियोजित दोन उत्तरकार्ये व साखरपुड्याचा कार्यक्रम पुढे ढकलले आहे. गावातील पंच मंडळाच्या या स्तुत्य कामगिरीचे कौतुक केले जात आहे. मोदलपाडा वासियांचा असा आदर्श इतरांनीही घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कोरोना या घातक रोगाने संपूर्ण जगातच थैमान घातले आहे. आपल्या देशातही अशा संशयित रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आरोग्य विभाग व प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहे. त्याचावर अजून कुठलाही असा ठोस औषधोपचार नाही. केवळ नागरिकांचा आपसातील संपर्कच त्यावर प्रभावी उपचार आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायतींमार्फत त्याबाबतची जनजागृती गावकऱ्यांमध्ये केली जात आहे. मोदलपाडा येथील नियोजित दोन उत्तरकार्ये व साखरपुडा रद्द करण्यात आला आहे. कारण गावातील रोहिदास जोत्र्या वसावे यांच्याकडे त्यांचे वडील कै.जोत्र्या वसावे यांच्या उत्तरकार्याचा कार्यक्रम २८ व २९ रोजी नियोजित करण्यात आला होता. याशिवाय गावातीलच रोहिदास बाबू पाडवी यांची पत्नी कै.कुसूमबाई पाडवी यांचाही उत्तरकार्याचा कार्यक्रम ३० व ३१ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र गावातील पंचमंडळी बळीराम पाडवी, पोलीस पाटील विलास पाडवी, तंटामुक्तीचे अध्यक्ष रमेश गावीत, काळूसिंग वळवी, गिरा पडवी, भानू वळवी, दिलीप वळवी आदी पंचमंडळाने या तिन्ही कुटुंबातील प्रमुख सदस्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बोलावून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक चर्चा केली. या घातक महामारीला रोखण्यासाठी नागरिकांचा आपसातील मोठा संपर्क टाळणे हीच प्रमुख उपाययोजना आहे. शिवाय कार्यक्रमात बहुसंख्येने लोक एकत्र येईल त्यामुळे कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती त्यांनी केली. पंच मंडळाने केलेल्या विनंतीस प्रतिसाद देवून या दोन्ही कुटुंबांनी आपले नियोजीत कार्यक्रम पुढे ढकलले. याशिवाय गणेश शामा वळवी यांचा मुलगा राजेश याचाही साखरपुडा कार्यक्रम निश्चित केला होता. तोही पंच मंडळाच्या विनंतीवरून रद्द करण्यात आला आहे. अशा धोरणात्मक निर्णयाबरोबरच मोदलपाड्यातील हे पंच मंडळ गावात प्रत्यक्ष घरोघरी जाऊन गावकऱ्यांमध्ये जनजागृती करीत आहे. जे कोणी गुजरातमधून अथवा बाहेर गावाहून आले आहेत त्यांना आरोग्य तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवित आहेत. साहजिकच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मोदलपाडाकरांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.