नगरपालिकेत विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:07 IST2020-01-15T13:07:53+5:302020-01-15T13:07:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विषय समित्यांमध्ये स्विकृत सदस्यांचा सहभाग असावा किंवा नसावा या मुद्द्यावरुन पालिकेच्या सभेत वाद झाला़ ...

Unrestricted selection of subject committee chairmen in the municipality | नगरपालिकेत विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड

नगरपालिकेत विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विषय समित्यांमध्ये स्विकृत सदस्यांचा सहभाग असावा किंवा नसावा या मुद्द्यावरुन पालिकेच्या सभेत वाद झाला़ पिठासीन निवडणूक निर्णय अधिकारी वसुमना पंत यांनी तात्काळ निर्वाळा दिल्यानंतर विषय समित्यांचे सभापती आणि सदस्य यांची बिनविरोध निवड झाली़
नगरपालिकेच्या विषय समित्यांचे सभापती निवडीच्या प्रक्रियेसाठी मंगळवारी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात सकाळी सभा बोलावण्यात आली होती़ यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत उपस्थित होत्या़ व्यासपीठावर नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, मुख्याधिकारी डॉ़ बाबूराव बिक्कड, उपनगराध्यक्षा भारती राजपूत यांची उपस्थिती होती़
प्रारंभी निवडणूक निर्णय अधिकारी पंत यांनी सभापती पदासाठी अर्ज करणाऱ्या सभासदांची माहिती दिली़ यानंतर त्यांनी सभेत सहा समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहिर केले़ निवडीप्रसंगी सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते़
निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय विभाग प्रमुख संजय माळी, दिपक पाटील, मोतीराम मराठे यांनी परिश्रम घेतले़ निवडीनंतर समर्थकांनी परिसरात फटाके फोडून तसेच ढोलताशांचा गजर करत आनंद व्यक्त केला़ निवड झालेल्या सभापतींची आमदार कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली़ यात कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होते़

Web Title: Unrestricted selection of subject committee chairmen in the municipality