शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
3
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
4
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
5
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
8
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
9
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
10
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
11
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
12
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
13
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
14
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
15
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
16
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
17
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
18
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
19
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
20
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस रोनकच्या आयुष्याला मायेची उब

By admin | Updated: May 25, 2017 12:39 IST

आदिवासी दाम्पत्याचा आदर्श : दलेलपूर येथील घटनेने दिला माणुसकीला ओलावा

ऑनलाईन लोकमत
तळोदा,दि.25- जन्मता:च नशीबी कुटुंबाचा आधार नसलेल्या रोनकला मातृपितृत्वाची माया देवून त्याचे आयुष्य एक आदिवासी गरीब दाम्पत्य फुलवित आहे. त्यांचा या आदर्श कार्यामुळे समाजातील हरवलेली माणुसकी अजूनही जीवंत असल्याचे दाखवून दिले आहे.
तळोदा शहरापासून चार किलो मीटर अंतरावर असलेलं दलेलपूर हे छोटसं गाव. संपूर्ण आदिवासी वस्ती असलेलं हे गाव याच गावात सुरेश गुंज्या पाडवी व बेबीबाई सुरेश पाडवी हे चाळीशीतील दाम्पत्य राहतात. भूमिहीन असलेलं हे दाम्पत्य मोल मजुरी करून आपला संसार चालवत आहेत. सन 2014 साली नेहमी प्रमाणे सकाळी सुरेश पाडवी हे बैल चारण्यासाठी गावापासून जवळ असलेल्या एका गव्हाच्या रिकाम्या शेतात गेले होते. त्याच वेळी बांधावर भरलेली एक पिशवी दिसली. ते पिशवी जवळ गेले असता त्यांना पिशवीत काही तरी हालचाल करित असल्याचे दिसले. ती पिशवी उघडताच त्यांना एका दिवसाचे अर्भक आढळले. हे अर्भक अक्षरश: रक्ताने माखलेलं होतं त्यांनी हा प्रकार गावाच्या पोलीस पाटलांना सांगितला. तसेच अर्भक त्यांच्या स्वाधीन देखील केले. या अर्भकाबाबत संपूर्ण गावात चौकशी केली. परंतु कोणीही हा प्रकार केला नसल्याचे निष्पन्न झाले. शेवटी तळोदा पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येवून पूर्ण चौकशी केली. पोलिसांनी पंचनामादेखील केला होता. त्यानंतर हे नवजात अर्भक स्वाधीन करण्याचा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला होता. मात्र या अर्भकाला सांभाळण्याचा निर्णय या आदिवासी दाम्पत्याने घेतला. पोलिसांनीही या बालकास पाळणाघरात न पाठवता सुरेश पाडवी यांच्या स्वाधीन केले. त्याबाबतची लिखापटी सुद्धा पोलिसांकडून लिहून घेण्यात आली. त्यानंतर पाडवी दाम्पत्याने या एका दिवसाचे अर्भकाचे मोठय़ा जिद्दीने संगोपन करत त्यास मोठ करीत आहे. हा बालक आता चार वर्षाचा झाला असून, तो सुदृढ आहे. पाडवी दाम्पत्याच्या या गौरवास्पद कार्यामुळे जन्मताच बेवारस असलेल्या रोनकला आई-वडील तर मिळालेच त्याचबरोबर त्याच्या आयुष्यात उजेड फुलला.