महादेवनगरातून दुचाकी लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:23 IST2021-01-13T05:23:24+5:302021-01-13T05:23:24+5:30

नवापूर शहरात किरकोळ अपघात नंदुरबार : नवापूर शहरातील धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर जुना आरटीओ नाका वळणावर ८ जानेवारी ...

The two-wheeler was removed from Mahadevnagar | महादेवनगरातून दुचाकी लांबवली

महादेवनगरातून दुचाकी लांबवली

नवापूर शहरात किरकोळ अपघात

नंदुरबार : नवापूर शहरातील धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर जुना आरटीओ नाका वळणावर ८ जानेवारी रोजी टीएन ३० बीएक्स ३५२० या ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार अंकित बालमुकुंद सोमाणी, रा. जनता पार्क, नवापूर हा युवक जखमी झाला. या प्रकरणी अंकित सोमाणी याने दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंबू येथून मोटारसायकल चोरी

नंदुरबार : शहादा तालुक्यातील कळंबू येथून युवराज मोतीलाल बाबर यांची एमएच ३९-एएच ०७६९ ही ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. रविवारी (दि. १०) ही घटना घडली. या प्रकरणी युवराज बाबर यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The two-wheeler was removed from Mahadevnagar