पालिकेतर्फे दोन अत्याधुनिक फवारणी मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:08 IST2020-07-05T12:08:48+5:302020-07-05T12:08:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे शहरात फवारणीसाठी दोन अद्ययावत फवारणी मशीन घेण्यात आले. या मशीनचा ...

Two state-of-the-art spraying machines by the municipality | पालिकेतर्फे दोन अत्याधुनिक फवारणी मशीन

पालिकेतर्फे दोन अत्याधुनिक फवारणी मशीन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे शहरात फवारणीसाठी दोन अद्ययावत फवारणी मशीन घेण्यात आले. या मशीनचा शुभारंभ माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
पालिकेतर्फे मागविण्यात आलेल्या दोन मशीन पैकी एक इटली तर दुसरे भारतीय बनावटीचे आधुनिक मशीन आहे. दोन मशीन पैकी एक साडेतीन लाख रुपये तर दुसरे एक लाख ७५ हजार रुपये किमतीचे आहे. या मशिनद्वारे कमी वेळात जास्त फवारणी होते. फवारणीसाठी टाकीची क्षमता मोठी आहे.
संपूर्ण शहरात या मशिनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे. पालिकेतर्फे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक असे दोन फवारणी मशीन घेण्यात आल्याचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम रघुवंशी, प्रीतम ढंडोरे, विशाल कांबळे, भारत भूषण, रवी काटे उपस्थित होते.

Web Title: Two state-of-the-art spraying machines by the municipality