शहाद्यात डंपरची कारला धडक दोन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 12:33 PM2021-01-20T12:33:39+5:302021-01-20T12:33:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव डंपरने कारला धडक दिल्याने दोनजण जखमी झाल्याची घटना शहादा येथे घडली. याबाबत डंपर ...

Two persons were injured when a dumper hit their car in Shahada | शहाद्यात डंपरची कारला धडक दोन जण जखमी

शहाद्यात डंपरची कारला धडक दोन जण जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव डंपरने कारला धडक दिल्याने दोनजण जखमी झाल्याची घटना शहादा येथे घडली. याबाबत डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
तेजस सुधीर गुंजाळ व मानसी शिरीष देवकर, दोन्ही रा.शिरुड-दिगर, ता.शहादा असे जखमींची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार, शहादा येथील स्टेट बॅंकेसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. भरधाव डंपरने (क्रमांक जीजे २६ टी ७४३८) समोरून येणाऱ्या कारला (क्रमांक एमएच ०६-एएन ३२१६) जबर धडक दिली. त्यात कारमधील तेजस गुंजाळ व मानसी देवकर हे जखमी झाले.  अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. याबाबत तेजस गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार जगदीश पाटील करीत आहे. 
दरम्यान, शहाद्यातील स्टेट बॅंक परिसरात तीन रस्ते येऊन मिळतात. तिन्ही रस्त्यांवर प्रचंड रहदारी असते. त्यामुळे येथे नेहमीच अपघात होत असतात. रहदारी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 

Web Title: Two persons were injured when a dumper hit their car in Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.