नोटा लांबवणारे दोघे ‘पर्यटक’ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:39 IST2020-02-07T12:39:21+5:302020-02-07T12:39:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील रनाळे येथील किराणा दुकानातून नोटांचे बंडल पाहण्यासाठी मागून त्यातून २४ हजार रुपये लंपास ...

The two note holders are in the 'tourist' area | नोटा लांबवणारे दोघे ‘पर्यटक’ अटकेत

नोटा लांबवणारे दोघे ‘पर्यटक’ अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील रनाळे येथील किराणा दुकानातून नोटांचे बंडल पाहण्यासाठी मागून त्यातून २४ हजार रुपये लंपास करणाऱ्या दोघा परदेशी पर्यटकांना एलसीबी व तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्यप्रदेशातून अटक केली़ दोघेही इराणचे रहिवासी आहेत़
फेरीडोनपौर सईद इस्माईल व मेहबुबीअली जमील रा. इराण अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत़
रनाळे येथील भरत चकोर यांच्या किराणा दुकानात मंगळवारी सकाळी १०.३० परदेशी दिसणाºया दोघांनी बनाव करत ४० हजाराचे नोटांचे बंडल पाहण्यासाठी मागितले होते़ दरम्यान त्यातून २४ हजार काढून घेत पळ काढला होता़ याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक महेंद्र्र पंडीत यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना तपास करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार पथकांनी नंदुरबार, शहादा आणि दोंडाईचा येथून माहिती घेतली होती़ दरम्यान नंदुरबार शहरातील हॉटेलमध्ये दोन विदेशी पुरुष व एक विदेशी महिला वास्तव्य करुन निघून गेल्याची माहिती देण्यात आली़ त्यांचा पेहराव आणि बोलीभाषा ही इराणी लोकांसारखी असल्याचे सांगण्यात आले होते़ दरम्यान दोघे चारचाकी वाहनाने मध्यप्रदेशात रवाना झाल्याची माहिती मिळाली होती़ यानुसार पथकाने खंडवा व देवास तपास सुरु केला होता़ संशयीत आरोपी चारचाकी वाहनाने खंडवा येथून देवासकडे जात असल्याची माहिती पोलीस अधिक्षक पंडीत यांना पथकांनी दिली होती़ पोलीस अधिक्षक पंडीत यांनी खंडवा आणि देवास येथील पोलीस अधिकाऱ्यांसोबत संपर्क करत माहिती दिली होती़ यानुसार मध्य प्रदेश व नंदुरबार पोलीसांनी संयुक्त कारवाई करत गुरुवारी पहाटे दोघांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून १३ हजार रुपये रोख आणि चारचाकी वाहन ताब्यात घेण्यात आले़
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस नाईक प्रमोद सोनवणे, राकेश मोरे, मोहन ढमढेरे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंगटे, सपोनि केदार, पोलीस नाईक कृष्णा गुले, ज्ञानेश्वर पाटील यांचे पथकाने केली


२०१० पासुन भारत पर्यटनाच्या बहाण्याने चोऱ्या करत असल्याची कबुली दोघांकडून देण्यात आली़ दोघेही शहरातील मोठ्या हॉटेल्समध्ये मुक्काम करुन त्याच्या आसपास असलेल्या ग्रामीण भागात भेटी देत चोºया करत असल्याचे कबुल केले आहे़ दोघांनी महाराष्ट्रासह देशातील अनेक शहरात गुन्हे केल्याची माहिती एलसीबीला मिळाली आहे़ दोघांकडून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़ या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलाचे राज्यासह देशातून कौतूक होत आहे़

Web Title: The two note holders are in the 'tourist' area