सारंगखेडा बॅरेजचे दोन दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 12:13 IST2020-06-29T12:13:25+5:302020-06-29T12:13:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : हतनूर धरण क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रीत करण्यासाठी हतनूरचे २६ दरवाजे ०.५० ...

Two gates of Sarangkheda Barrage opened | सारंगखेडा बॅरेजचे दोन दरवाजे उघडले

सारंगखेडा बॅरेजचे दोन दरवाजे उघडले

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : हतनूर धरण क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रीत करण्यासाठी हतनूरचे २६ दरवाजे ०.५० मीटर उंचीने उघडण्यात आले आहे. त्यामुळे २३ हजार ८७६ क्युसेस पाण्याचा विसर्ग तापी नदीत सोडण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सारंगखेडा येथील बॅरेजमधील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी नऊ वाजता बॅरेजचे दोन दरवाजे १ मीटर उंचीने उघडण्यात आले आहे.
सारंगखेडा, ता.शहादा येथील मध्यप प्रकल्पात ११९.४० मीटर एवढा पाण्याचा साठा असून, या दोन गेटद्वारे ७७८५.९९ क्युसेस पाण्याचा विसर्ग तापीच्या पात्रात सोडण्यात आला. दरम्यान वेळोवेळी पावसाचा अंदाज लक्षात घेता पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

Web Title: Two gates of Sarangkheda Barrage opened