भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:14 IST2019-08-02T12:14:37+5:302019-08-02T12:14:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव प्रवासी रिक्षाने समोरून येणा:या दुचाकीला धडक दिल्याने एकजण ठार तर सात प्रवासी जखमी ...

Two cyclists killed in road accident | भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीचालक ठार

भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीचालक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव प्रवासी रिक्षाने समोरून येणा:या दुचाकीला धडक दिल्याने एकजण ठार तर सात प्रवासी जखमी झाल्याची घटना ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर कवली, ता.अक्कलकुवानजीक गुरुवारी दुपारी घडली. 
अंकित शांताराम वसावे (32) रा.काकडखुंट, ता.अक्कलकुवा असे मयताचे नाव आहे. जखमींवर उपचार करून त्यांना घरी जावू देण्यात आल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत. गुजरातकडून अक्कलकुवाकडे येणा:या अॅपेरिक्षाने (एमएच 39-जे 7403) समोरून येणा:या दुचाकीला (क्रमांक जीजे 19-आर 9541) जबर धडक दिली.
 त्यात अंकित वसावे हा जागीच ठार झाला. अपघातातील जखमींना रस्त्याने येणा:या जाणा:यांनी मदतीचा हात दिला. 
याबाबत पोलीस नाईक अनिश वसावे यांनी फिर्याद दिल्याने रिक्षाचालक सतिष वळवी, रा.धुळवद याच्याविरुद्ध अक्कलकुवा    पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पावरा करीत आहे. 
 

Web Title: Two cyclists killed in road accident