शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

उसाने भरलेला ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 13:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद :  म्हसावद, ता.शहादा येथील ग्रामीण रूग्णालयाजवळील कन्हेरी नदीला लागून असलेल्या वळण रस्त्यावर बुधवारी पहाटे उसाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद :  म्हसावद, ता.शहादा येथील ग्रामीण रूग्णालयाजवळील कन्हेरी नदीला लागून असलेल्या वळण रस्त्यावर बुधवारी पहाटे उसाने भरलेला ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने यात चालक व क्लिनर बचावले असून, कुठलीही जीवित हानी झाली नसल्याने सुटकेचा निश्वास घेण्यात आला. याबाबत असे की, बुधवारी पहाटे बोरद, ता.तळोदा येथून ऊसाने भरलेला ट्रक क्रमांक एमएच १८ - एम ७७६१ हा मध्यप्रदेशातील दुर्गा खांडसरी येथे जात होता. नदीला लागून असलेल्या वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव जाणारा ट्रक कन्हेरी नदीत उलटला. यात ट्रक चालक व क्लिनर जखमी झाले आहे. या दोघांनाही ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे.दरम्यान, म्हसावद गावाजवळील ग्रामीण रूग्णालयापासून तर अनकवाडे पुलापर्यंतच्या कन्हेरी नदीला लागून असलेल्या रस्त्यावरील पुलावरील संरक्षक भिंत जमिनीला लागून आहे. याठिकाणी वळण रस्ता असूनही संरक्षक भिंत नाही. परिणामी भरधाव जाणाऱ्या वाहनचालकास रस्ता रूंदीकरण समजून येत नाही. त्यासाठी संरक्षक भिंतीची उंची वाढवणे आवश्यक झाले आहे. या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण जास्त आहे तर किरकोळ व्यावसायिकही रस्त्याला लागूनच अतिक्रमणावर दुकाने लावतात. परिणामी वाहनचालकास इकडे आड तिकडे विहीर, अशी परिस्थिती उभी राहते. तरी येथील रस्त्यावरील संरक्षक भिंतीची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.