पुलावरून ट्रक नदीत कोसळला; ट्रक चक्काचूर, चालक सहचालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST2021-05-06T04:32:39+5:302021-05-06T04:32:39+5:30

विसरवाडी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास धुळ्याकडून गुजरात राज्याकडे पावडर भरून जात असताना अपघात झाला. ...

The truck crashed into the river from the bridge; Truck shattered, driver co-driver injured | पुलावरून ट्रक नदीत कोसळला; ट्रक चक्काचूर, चालक सहचालक जखमी

पुलावरून ट्रक नदीत कोसळला; ट्रक चक्काचूर, चालक सहचालक जखमी

विसरवाडी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास धुळ्याकडून गुजरात राज्याकडे पावडर भरून जात असताना अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दहा फूट पुलावरून पानबारा नदीत कोसळला. ट्रक उलटा पडल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

चालक व सहचालक यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पानबारा ग्रामस्थांनी घटनास्थळी मदत केली. नवापूर तालुक्यातील महामार्गावरील पुलांचे काम लवकर करण्याची मागणी होत आहे. पुलांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. अनेकांचे बळी गेले आहेत. परंतु अजूनही पुलाच्या कामाला गती मिळाली नाही. धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामालादेखील मोठ्या प्रमाणात गती मिळावी यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे.

Web Title: The truck crashed into the river from the bridge; Truck shattered, driver co-driver injured