आदिवासी पावरा समाजाचा गुणगौरव समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:38 IST2020-02-06T12:37:59+5:302020-02-06T12:38:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समस्त आदिवासी पावरा समाज मंडळाच्यावतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी व समाजाला योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव ...

Tribal Powar community awards ceremony | आदिवासी पावरा समाजाचा गुणगौरव समारंभ

आदिवासी पावरा समाजाचा गुणगौरव समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : समस्त आदिवासी पावरा समाज मंडळाच्यावतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी व समाजाला योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला़ रविवारी शहरातील देवमोगरा माता मंदिरावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ अध्यक्षस्थानी माजी सभापती अहिल्याबाई इंद्रसिंग पावरा होत्या़
कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांच्याहस्ते करण्यात आले़ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजीमंत्री अ‍ॅड़ पद्माकर वळवी, अखिल भारतीय पावरा-बारेला संघाचे अध्यक्ष नामदेव पटले, प्रा़ डॉ़ भरतसिंग पटले़ सुरेश मोरे, जेलसिंग पावरा, सत्रासेन येथे रविंद्र भादले, प्रा़ मोहन पावरा, रतिलाल पावरा, विजया विरसिंग पावरा, डॉ़ भरत वळवी, बी़ई़वसावे, अ‍ॅड़ भगतसिंग पाडवी, वासुदेव गांगुर्डे, अर्जुन पटले, नायब तहसीलदार बहादूर पावरा उपस्थित होते़ प्रारंभी याहामोगी माता व तंट्या भिल यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज मंडळाचे नंदुरबारचे अध्यक्ष प्रा़ सरदार पावरा यांनी केले़
यावेळी बोलताना पालकमंत्री अ‍ॅड़ पाडवी यांनी, आदिवासी समाजाची अस्मिता आणि संस्कृती याची माहिती दिली़ तसेच युपीएससी परीक्षेची तयारी करणाºया आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दिल्ली येथे वसतीगृह तयार करणे, डीबीटी योजना बंद करणे, आदिवासी क्रीडा अकादमी, मेडीकल आणि इंजिनियरींग करणाºया विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांमध्ये काही जागा राखीव ठेवण्याचा तसेच शासकीय आश्रमशाळा आणि वसतीगृहांच्या समस्या दूर करुन आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात योगदान देणार असल्याचे सांगितले़ प्रा़ भरतसिंग पटेल यांनी आदिवासी संस्कृती आणि संवर्धन या विषयावर मनोगत व्यक्त केले़
कार्यक्रमात आदिवासी पावरा समाजाच्या वेशभूषा स्पर्धेचे विजेते, दहावी-बारावी, पदवी, पदव्युत्तर तंत्रशिक्षणात यश प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला़

Web Title: Tribal Powar community awards ceremony