शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची वृक्ष लागवडीत कोटीची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शासनाच्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात नंदुरबार जिल्ह्याने 100 टक्के योगदान देत 1 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाच्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात नंदुरबार जिल्ह्याने 100 टक्के योगदान देत 1 कोटी झाडे रोवली आहेत़ यामुळे राज्यात नंदुरबार सातव्या स्थानावर असून तीन महिन्यात जिल्ह्याने दिलेल्या उद्दीष्टय़ापेक्षा अधिक वृक्षांचे रोपण केले आह़े 1 जुलै पासून राज्यासह जिल्ह्यात वृक्षलागवडीच्या कामांना सुरुवात झाली होती़ शासनाकडून जिल्ह्याला 91 लाख 44 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्टय़ देण्यात आले होत़े यासाठी विविध भागात 95 लाख 72 हजार 955 खड्डे खोदण्यात आले होत़े यातून 36 शासकीय विभागांनी योगदान देत वृक्षारोपण सुरुच ठेवले होत़े गेल्या महिन्यात जिल्ह्यात 91 लाख झाडांचे उद्दीष्टय़ पूर्ण केल्यानंतरही विविध सामाजिक संस्था, नगरपालिका, शाळा, महाविद्यालये यांच्या साथीने जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सुरु होता़ यातून आजअखेरीस 1 कोटी 1 हजार 226 झाडांचे रोपण पूर्ण करण्यात आली आह़े यात सर्वाधिक 47 लाख झाडे ही एकटय़ा वनविभागाने लावली असून वनक्षेत्रांसह राखीव कुरण आणि आरक्षित जमिनींवर झाडांचे रोपण करण्यात आले आह़े एकूण 95 लाख खड्डे पूण वापरात आल्यानंतर नवीन वृक्षांच्या रोपणासाठी नव्याने खड्डे करुन वृक्षारोपण करण्यात आले आह़े यात जिल्ह्यातील 2 लाख 31 हजार 299 नागरिकांनी सहभाग दिल्याने 1 कोटींचा मोठा आकडा प्रथमच पार झाल्याची माहिती सहायक वनसरंक्षक गणेश रणदिवे यांनी दिली आह़े 

राज्यात सातव्या क्रमांकाचे वृक्ष लागवडीचे उद्दीष्टय़ पूर्ण करणा:या नंदुरबार जिल्ह्याने खान्देशातही प्रथम क्रमांक पटकावला आह़े उद्दीष्टय़पूर्तीच्या बाबतीत धुळे 21 तर जळगाव जिल्हा राज्यात 22 व्या स्थानावर आह़े शासकीय विभागांनी या उपक्रमासाठी मोठा सहभाग दिला होता़ 14 विभागांनी 100 टक्के वृक्ष लागवड केल्याची माहिती आह़े यापुढे वृक्ष संवर्धन कार्यक्रमाला सुरुवात होणार आह़े