आठ शेळ्या ठार करणाऱ्या बिबट्यासाठी लावला सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST2021-02-05T08:08:09+5:302021-02-05T08:08:09+5:30

शहादा तालुक्यातील बिलाडी ससदे परिसरात उसाच्या वाडीत बिबट्याच्या मुक्त संचार असल्याचे दिसून आले होते. दरम्यान ससदे गावातील आदिवासी वसाहतीतील ...

A trap set for a leopard that kills eight goats | आठ शेळ्या ठार करणाऱ्या बिबट्यासाठी लावला सापळा

आठ शेळ्या ठार करणाऱ्या बिबट्यासाठी लावला सापळा

शहादा तालुक्यातील बिलाडी ससदे परिसरात उसाच्या वाडीत बिबट्याच्या मुक्त संचार असल्याचे दिसून आले होते. दरम्यान ससदे गावातील आदिवासी वसाहतीतील शेळ्यांचा फडशा बिबट्याने पाडला होता. १ फेब्रुवारीच्या रात्री रात्रभर डरकाळ्या फोडत बिबट्याने दहशत निर्माण केली होती. हा प्रकार १५ दिवसांपासून सुरू असल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी वनविभागाकडे लेखी पाठपुरावा केला होता. परंतु त्यांच्या अर्जावर कार्यवाही झालेली नव्हती. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या वनविभागाने बुधवारी उसाच्या शेतात पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पिंजरा लावल्यानंतर वनविभागाने सुरक्षिततेच्या संदर्भात सूचना केल्या आहेत. या परिसरात लहान बालक, महिला यांनी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच हिंस्र प्राण्यांना पळवण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली आहे. यावेळी वनपाल एस.एस. देसले, बी.एल. राजपूत, बी.आर.शहा, रोहिदास पावरा, लेखापाल एन.डी. गिरासे, वाहन चालक नईम मिर्झा वनमजूर भीमा चव्हाण, छबू भिल आदी उपस्थित होते. दरम्यान वनपाल बी.एल.राजपूत यांना संपर्क केला असता, बिबट्या लवकरच जेरबंद होईल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. बिलाडी सरपंच जवाहर पाटील, पोलीस पाटील गणेश पाटील, वसंत पाटील, कोमलसिंग गिरासे उपस्थित होते.

Web Title: A trap set for a leopard that kills eight goats