शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील व्यवहाराचा गाडा आला रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 12:18 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनलॉकडाऊन एक सुरू झाल्यापासून अर्थात १ जून पासून जिल्ह्यातील अर्थव्यवस्था आणि ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनलॉकडाऊन एक सुरू झाल्यापासून अर्थात १ जून पासून जिल्ह्यातील अर्थव्यवस्था आणि एकुणच बाजारपेठेतील उलाढाल सुरळीत होण्यास सुरुवात झाली. सद्य स्थितीत व्यवहाराची गाडी रुळावर आली आहे. जिल्ह्यात औद्योगिकरण नसल्यामुळे परत आलेल्या मजुरांना स्थानिक ठिकाणीच रोहयोच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याने मोठी मदत झाली.नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीपासूनच आटोक्यात होता. त्यामुळे जिल्हा कधीही रेडझोनमध्ये गेला नाही. असे असले तरी कोरोना आटोक्यात राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. परिणामी जिल्हा आॅरेंज झोनमध्येच राहिला. त्याचा फायदा १ जूनपासून सुरू झालेल्या अनलॉकडाऊन १ मध्ये जिल्ह्याला चांगला फायदा झाला. अनेक बाबींना सवलती मिळाल्या. त्याचा परिणाम बाजारपेठेतील उलाढाल सुरळीत होण्यास, बेरोजगारांना काम मिळण्यात झाले. महिनाभरात वेळोवेळी अनेक बाबींना सवलती मिळत गेल्याने आता जिल्ह्यातील व्यवहार ८० टक्के सर्वसामान्य झाले आहेत.परराज्यात रोजागारासाठी गेलेले जवळपास ४८ हजार पेक्षा अधीक मजूर लॉकडाऊनच्या काळात परत आले. या मजुरांना परत आल्यावर स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नियोजन करून ठेवले. रोहयोवरील मजुरांची संख्या तब्बल ६२ हजारापर्यंत गेली होती. नाशिक विभागात हा उच्चांक होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारीमुळे मजुरांचे फारशी अडचण आली नाही.सद्य स्थितीत बाजारपेठेची वेळ ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेची आहे. जिल्हाअंतर्गत एस.टी.वाहतूक सेवा मर्यादीत स्वरूपात सुरू झाली आहे. ग्रामिण भागात अद्यापही एस.टी.सेवा सुरू झाली नाही. ती सुरू झाल्यास आणखी फरक पडणार आहे. लहान, मोठे उद्योग देखील जिल्ह्यात सुरू आहेत. त्यात नंदुरबारातील मिरची प्रक्रिया उद्योग, नवापुरातील दाळ प्रक्रिया उद्योग, एमआयडीसीतील उद्योग सुरू आहेत. जिल्ह्यातील सहाही बाजार समितींमध्ये शेतीमालाची खरेदी-विक्री सुरू आहे. शहादा व नंदुरबारातील कापूस खरेदी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांचा उर्वरित सर्व कापूस खरेदी केला जात आहे. शाळा, महाविद्यालये, आंतरजिल्हा एस.टी.वाहतूक तसेच सिनेमागृहे आणि उद्याने सुरू झाल्यास आणखी फरक पडणार आहे. परंतु ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊनच्या कालावधी वाढविण्यात आल्याने या सेवा महिनाभर बंदच राहतील.एकुणच जिल्ह्यातील व्यवहार ७५ ते ८० टक्के व्यवहार सुरळीत झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव मर्यादीत राहिला तर येत्या काळात जिल्ह्यातील संपुर्ण व्यवहाराचा गाडा रुळावर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.