शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त पार्र्कींगमुळे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा शहरात बेशिस्त पार्किंगमुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे बेशिस्त ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा शहरात बेशिस्त पार्किंगमुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे बेशिस्त पार्किंग व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली असून, संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.तळोदा हे तालुक्याचे शहर असून, विविध कामानिमित्त ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. तसेच ग्रामीण भागातदेखील आवश्यक त्या प्रमाणात सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने दुचाकी वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र शहरातील रत्यावर फिरणारे दुचाकीधाकर बेशिस्तपणे कुठेही वाहने उभी करीत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचा झाला असून, शहरातील अतिक्रमण, अरूंद रस्ते, लॉरीधारक रस्त्यावरच बेशिस्तपणे उभे राहत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटील बनत चालला आहे. वळण रस्त्याअभावी शहरातून सर्व प्रकारची जड व अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यातच दुचाकीधारकांनी व अन्य वाहनधारकांनी बेशिस्तपणे केलेल्या पार्किंगमुळे इतर वाहनधारकांना वाहने मार्गस्थ करताना तारेवरची कसरत करावी लागते. सकाळ व संध्याकाळच्या सुमारस या प्रकारामुळे नागरिकांना पायी चालणेदेखील जिकरीचे ठरत असल्याचा अनुभव काही सुज्ञ नागरिकांना बोलून दाखविला.दरम्यान, तळोदा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाकडून केवळ प्रासंगिक उपाययोजना केल्या जात असल्याचे दिसून आले आहे. शहरातील अतिक्रमण मोठा गाजावाजा करून अनेकदा काढण्यात आले. परंतु काही कालावधीनंतर अतिक्रमण पुन्हा जैसे थे होत असल्याचा अनुभव आहे.दरम्यान, वाहतुक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडण्यासाठी अतिक्रमण हटविणे व बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. तसेच रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या कमी करण्यासाठी तळोदा शहरात प्रायोगिक तत्वावर सम-विषम यासारख्या पद्धतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे सांगितले जाते.