शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहने अडकल्याने वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा-डामरखेडा रस्त्यावर रविवारी दोन अवजड वाहनांमुळे व खराब रस्त्यामुळे सुमारे एक तास वाहतूक ठप्प ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा-डामरखेडा रस्त्यावर रविवारी दोन अवजड वाहनांमुळे व खराब रस्त्यामुळे सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याने तासभर इतर वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा ते शहादा दरम्यान रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यातच प्रकाशा ते करजई-बुपकरी दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. कच्च्या रस्त्यामुळे धूळही मोठय़ा प्रमाणात उडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रविवारी गोमाई नदीवरील पुलावर एक अवजड वाहन तर दुसरे अवजड वाहन डामरखेडा गावालगत अडकल्याने इतर वाहनांना निघण्यासाठी जागाच नव्हती. त्यामुळे या मार्गावर सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. या प्रकारामुळे इतर वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अवजड वाहने, ऊस वाहून नेणारी वाहने यांच्यासाठी प्रकाशा ते डामरखेडा रस्ता तारेवरची कसरत बनला आहे. त्यातच वाहन नादुरूस्त होणे, हळू चालणे, वाहन थांबणे असे प्रकार घडत असल्याने वारंवार वाहतूक ठप्प होते.  रविवारी वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेकांचे हाल झाले. रुग्णवाहिकाही अडकून होती. अशात अनुचित  प्रकार घडू नये यासाठी ठेकेदाराला समज देणे आवश्यक आहे. साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस वाहतूक करणा:या वाहनांची संख्या वाढली आहे. या वाहनांना अपघात होऊ नये म्हणून रस्त्याची दुरुस्ती आवश्यक आहे. रस्त्याचे काम करणा:या संबंधित ठेकेदाराला वरिष्ठ अधिका:यांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सक्त ताकीद देण्याची आवश्यकता आहे.