शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शासनाच्या सूचनेनुसारच होणार पारंपरिक गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 12:52 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आगामी गणेशोत्सव हा साधेपणाने मंडळांनी साजरा करावा यासाठी मार्गदर्शक सूचना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आगामी गणेशोत्सव हा साधेपणाने मंडळांनी साजरा करावा यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत़ शासनाकडून जाहिर करण्यात आलेल्या सूचनांचे गणेश मंडळांनी स्वागत केले असून साधेपणाने उत्सव साजरा करुन कोरोनाचा संसर्ग होवू देणार नाही असा निर्धार केला आहे़दीडशतकी परंपरा असलेल्या नंदुरबार शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती ह्या पारंपरिक पद्धतीने तयार करुन आगळावेगळा असा गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे़ मानाचे श्रीमंत दादा गणपती, श्रीमंत बाबा गणपती यांच्यासह गणेश मंडळांचा गोतावळा संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे़ काळ्या मातीतून घडवण्यात येणाऱ्या या सर्व मूर्तींमुळे हा उत्सव पारंपरिक ईको फ्रेंडली गणेशोत्सव आहे़ यामुळे याठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी उसळते़ गर्दीमुळे कोरोना होण्याची शक्यता असल्याने १२ प्रकारच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत़ यात प्रामुख्याने मूर्तींचा आकार हा लहान ठेवण्याचे सुचवले आहे़ शहरातील बहुतांश मंडळांच्या मूर्ती ह्या आकाराने तशा लहानच असल्याचे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले़शासनाच्या निर्णयानुसार गणेशोत्सव साजरा होईल़ मंडळाची बैठक घेऊन सगळ्यांना याबाबत माहिती दिली जाईल़ श्रीमंत बाबा गणपतीची मूर्ती ही चार फूटापेक्षा अधिक नसते़ तसेच ईको फ्रेंडली अशी मूर्तीही रथावर होते़ कोरोनामुक्तीसाठी मंडळ शासनासोबत आहे़-सुनील सोनार, ज्येष्ठ पदाधिकारी श्रीमंत बाबा गणेश मंडळ, नंदुरबाऱयंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जाईल़ मूर्तीचा आकारही लहान असणार आहे़ स्वागत किंवा विसर्जन मिरवणूका होणार नाहीत़ ढोल पथकाची हजेरी लागणार नाही़ गर्दी होणार नाही याचीही दक्षता मंडळाकडून घेतली जाईल़-महेंद्र फटकाळ, ज्येष्ठ पदाधिकारी पवनपुत्र युवक मंडळ, नंदुरबाऱजिल्ह्यात खाजगी २४० तर ५४९ सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी आहे़ जिल्ह्या ९ टप्प्यात गणेश विसर्जन करण्यात येते़ या मंडळांच्या कार्यकारिणी आणि बैठका अद्याप व्हायच्या आहेत़ शासनाने सूचना केल्यानंतर मंडळांच्या ज्येष्ठ पदाधिकाºयांनी सोशल मिडिया ग्रुपमधून त्यावर चर्चा घडवून आणली़ ज्येष्ठांसह युवा पदाधिकाºयांनी या सूचनांचा सन्मान करत गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासह आॅनलाईन दर्शन आणि आरती करण्यास प्राधान्य देण्याचे सांगितले आहे़ मानाच्या गणपतींचे आॅनलाईन दर्शनच होणार आहे़ मूर्तींचा आकार चार फुटांपर्यंतच राहिल यावरही एकमत करण्यात आल्याची माहिती मंडळांच्या पदाधिकाºयांनी दिली आहे़