सामूहिक वनहक्क जमिनीच्या विकासासाठी तोरणमाळला सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:05 PM2020-02-17T12:05:49+5:302020-02-17T12:06:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सामुहिक वनहक्कातून प्राप्त झालेल्या जमिनीच्या विकासात भर टाकण्यासाठी जुने तोरणमाळ ता. धडगाव येथे प्रशाकिय ...

Toranmala Sabha for collective forest land development | सामूहिक वनहक्क जमिनीच्या विकासासाठी तोरणमाळला सभा

सामूहिक वनहक्क जमिनीच्या विकासासाठी तोरणमाळला सभा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : सामुहिक वनहक्कातून प्राप्त झालेल्या जमिनीच्या विकासात भर टाकण्यासाठी जुने तोरणमाळ ता. धडगाव येथे प्रशाकिय अधिकारी व समन्वय समितीची सभा घेण्यात आली. सभेनंतर मागील वर्षी झालेल्या वृक्षलागवडीची पाहणीही करण्यात आली.
सभेत जिल्हा कन्व्हर्जन समितीचे सचिव उपवनसंरक्षक सुरेश केवटे, लोकसंघर्ष समितीच्या प्रतिभा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य गणेश पराडके, लोक समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय महाजन, महेश पाडवी, मुकेश वळवी, कात्रीचे सरपंच संदीप वळवी, सामुहिक वनहक्क संवर्धन समितीचे अध्यक्ष सुनील रावताळे, उपाध्यक्ष सिमाबाई चौधरी, सचिव रोहिदास चौधरी यांच्या ग्रामस्थांनी उपस्थिती नोंदवली. शिवाय विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी देखील उपस्थित राहून काही योजनांची माहिती दिली.

जुने तोरणमाळ येथे मागील पावसाळ्यात आठ हेक्टर वनक्षेत्रात बांबू, जांभूळ, आंबा व शेवगा या वृक्ष लागवड करण्यात आली होती. त्या रोपट्यांचीही सभेनंतर पाहणी करण्यात आली. त्यात ८५ टक्के रोपे जिवंत असल्याचे दिसून आले. यातून या परिसरातील वनराई तसेच गावाला उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होणार आहे. याबाबत तोरणमाळचे ग्रामस्थ व वनकर्मचारी मोरे यांचे कौतुक करण्यात आले.

Web Title: Toranmala Sabha for collective forest land development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.