शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

चार मोटारसायकलींसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहर व परिसरातील मोटरसायकलींची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या तिघांना शहादा पोलिसांनी अटक केली ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहर व परिसरातील मोटरसायकलींची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या तिघांना शहादा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या टोळीकडून चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. गेल्या काही महिन्यापासून शहरात मोटरसायकली चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. यामुळे नागरिकही हैराण झाले होते.शहादा शहरात होणाºया मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी पोलीस निरीक्षक के.एल. नजनपाटील यांनी एक स्वतंत्र पथक तयार केले. या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी शहादा शहरात तसेच प्रकाशा गावात गस्त करीत असतांना माहिती मिळाली की, प्रकाशा गावालगत अंकलेश्वर हायवेजवळील एका हॉटेलवर एक जण नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने आलेला आहे, अशी बातमी मिळाली. पथकातील कर्मचारी हवालदार जे.एम. शेरन, गौतम बोराळे, वंतू गावीत, विकास कापुरे, देवराम गावीत, प्रकाश तमखाने, अफसर शाह, अनमोल राठोड, पंकज जिरेमाळी, शोएब शेख यांनी लागलीच प्रकाशा येथे सापळा लावून या संशयित इसमास त्याच्याजवळील एक लाल काळ्या रंगाच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले. तेव्हा त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने आपले नाव विक्रम गोट्या पाडवी रा.हाकडीकेली पो.काकडदा, ता. धडगाव असे सांगितले. त्याला अधिक विचारपूस केली असता त्याने शहादा शहरात विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या इतर चार मोटारसायकली अर्जुन संजय कोळी व शिवनाथ पिंटू भिल दोन्ही रा.प्रकाशा, ता.शहादा यांना दिल्या असल्याचे सांगितले. तेव्हा अर्जुन संजय कोळी व शिवनाथ पिंटू भिल यांनाही पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्यांनी चार मोटारसायकली काढून दिल्या. गेल्या काही महिन्यात शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. या घटनेमागे प्रशिक्षित टोळी असण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र चोरटे पोलीस कारवाईपासून दूर होते. या तिघा संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.