शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर चिखल झाल्याने तीन तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :  प्रकाशा ते शहादा रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे करण्याचे काम सुरू आहे. ज्याठिकाणी काम सुरू आहे तेथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा :  प्रकाशा ते शहादा रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे करण्याचे काम सुरू आहे. ज्याठिकाणी काम सुरू आहे तेथे मातीचा कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने या मातीच्या पर्यायी रस्त्यांवर प्रचंड चिखल साचल्याने वाहनधारक अक्षरश: कंटाळले आहेत. हा प्रकार नित्याचाच झाल्याने प्रकाशा ग्रामस्थ कंटाळले असून मंगळवारी रस्ता रोको करणार आहेत.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा ते शहादा दरम्यान रस्त्याच्या कामामुळे मोठी अडचण येत आहे. मातीच्या भराव ज्याठिकाणी केला आहे अशा ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे चिखल झाला आहे. या चिखलामुळे लहान-मोठी वाहने  घसरुन अपघातही होत आहेत. अशीच परिस्थिती कोरीट पेट्रोल पंपाजवळ झाली असून रस्त्याच्या अर्धवट कामामुळे सोमवारी सकाळी मालवाहू टेम्पो उलटून अपघात झाला. सोमवारी दुपारी तीन वाजेपासून तीन तास वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. त्यात शहादा येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थीही बसमध्ये अडकून पडले. तीन ते चार तास  वाहतूक ठप्प झाल्याने या विद्याथ्र्याचे पालकही हैराण झाले होते. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने पर्यायी रस्ते मातीचे केल्याने पावसाळ्यात ही समस्या निर्माण होत आहे. या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांचे अतोनात हाल होत आहेत. या समस्येवर प्रभावी उपाययोजनेसाठी प्रकाशा येथे मंगळवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वि.का. सोसायटीचे अध्यक्ष हरी पाटील यांनी दिली.