शहाद्यातील तीन नगरसेवक व १९ सरपंच यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST2021-06-18T04:22:05+5:302021-06-18T04:22:05+5:30

नंदुरबार : शहाद्यातील तीन नगरसेवक व तालुक्यातील १९ गावांच्या सरपंचांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ...

Three corporators and 19 sarpanches from Shahada join NCP | शहाद्यातील तीन नगरसेवक व १९ सरपंच यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

शहाद्यातील तीन नगरसेवक व १९ सरपंच यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

नंदुरबार : शहाद्यातील तीन नगरसेवक व तालुक्यातील १९ गावांच्या सरपंचांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम झाला.

शहादा नगरपालिकेची डिसेंबर महिन्यात निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार तयारी सुरू आहे. त्याच अनुषंगाने गुरुवारी तीन नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे प्रभारी व प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पक्षाचे निरीक्षक नाना महाले, जिल्हा अध्यक्ष डॉ.अभिजित मोरे, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक शांतीलाल साळी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पक्षात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये सईदा बी अन्सारी (भाजप), सय्यद सायरा बी अली लियाकत (एमआयएम), सुमनभाई विश्राम पवार (काॅंग्रेस) यांचा समावेश आहे, तर सरपंचांमध्ये सपनाबाई मोहन शेवाळे, परिवर्धा, बुधा कृष्णा ठाकरे, औरंगपूर, ईश्वर ठाकरे, कार्थदा, संग्राम ठाकरे, चिरखान, शकंर वाघ, पिंपर्डे, अनुबाई सोनवणे, कर्जांत, भिमजी ठाकरे, मानमो, सुरेश ठाकरे, न्यूबन, गोवर्धन ठाकरे, तऱ्हाडी, कैलास पवार, सुलवाडे, महेंद्र शेवाळे, कुरंगी, प्रभाकर ठाकरे, कन्साई, रवींद्र पाडवी, शहाणे, भरत ठाकरे, कन्साई खु., सुभाष शेमळे, वाघोदा, संगीताबाई पवार, हिंगणी, संतोष ठाकरे, औरंगपूर, रवींद्र ठाकरे उपसरपंच, डामरखेडा, गणेश भिल, कार्थदा खु. यांचा समावेश असल्याची माहिती शांतीलाल साळी यांनी दिली.

Web Title: Three corporators and 19 sarpanches from Shahada join NCP