जिल्ह्यात तीन विवाहितांचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:17 PM2019-12-16T12:17:02+5:302019-12-16T12:17:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माहेरुन पैसे आणावेत तसेच इतर कारणांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी विवाहितांच्या छळप्रकरणी पोलीसात गुन्हे दाखल करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : माहेरुन पैसे आणावेत तसेच इतर कारणांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी विवाहितांच्या छळप्रकरणी पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ विवाहितांच्या फिर्यादीवरुन ही कारवाई करण्यात आली़
उपनगर पोलीस ठाणे
खेडदिगर ता़ शहादा येथील सासर तर शहरातील इंदिरानगर येथील माहेर असलेल्या हिरल हर्षल पटेल यांचा सासरच्यांनी दहा लाख रुपयांसाठी छळ केला़ नोव्हेंबर २०१६ ते आॅगस्ट २०१९ पर्यंत हा प्रकार सुरु होता़ मेडिकल दुकान टाकण्यासाठी माहेरुन पैसे आणावेत अशी सासरच्यांची मागणी होती़ याबाबत हिरल पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती हर्षल रोहिदास पटेल, सासरे रोहिदास लक्ष्मण पटेल, सासू रंजनाबाई रा़ खेडदिगर, हर्षा नारायण पाटील व प्रज्ञा प्रशांत पाटील दोन्ही रा़ सुलवाडे यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़
शहादा पोलीस ठाणे
असलोद येथील माहेर तर यावल येथील सासर असलेल्या पूनम विरेंद्रसिंग सिसोदिया यांचा हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ केला़ मार्च ते सप्टेंबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला़ याबाबत पूनम सिसोदिया यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती विरेंद्रसिंग तेजपालसिंग सिसोदिया, सासरे तेजपालसिंग सिसोदिया, सासू मिनाबाई तिघे रा़ यावल व राजेंद्रसिंग जगन्नाथसिंग जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे करत आहेत़
उपनगर पोलीस ठाणे
शहरातील माहेर असलेल्या भारती हेमकांत बच्छाव यांचा सासरच्यांकडून तीन लाख रुपयांसाठी छळ करण्यात आला़ पती हेमकांत व सासू कल्पनाबाई चंद्रकांत बच्छाव रा़ साक्री यांनी चारित्र्यावर संशय घेत मानसिक व शारिरिक त्रास दिला होता़ याप्रकरणी विवाहितेने महिला दक्षता समितीकडे अर्ज दिला होता़ याबाबत भारती बच्छाव यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती हेमकांत व सासू कल्पनाबाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे़