मीटरमध्ये फेरफार करुन ९९ हजाराची वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:14 IST2020-01-15T13:14:44+5:302020-01-15T13:14:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खांडबारा ता़ नवापुर येथे वीज मीटरमध्ये फेरफार करुन ९९ हजार रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी ...

Thousands of power theft by manipulating meters | मीटरमध्ये फेरफार करुन ९९ हजाराची वीज चोरी

मीटरमध्ये फेरफार करुन ९९ हजाराची वीज चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खांडबारा ता़ नवापुर येथे वीज मीटरमध्ये फेरफार करुन ९९ हजार रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली़ सोमवारी कंपनीकडून याबाबत फिर्याद देण्यात आली़
खांडबारा गावातील मेनरोडवरील रंजनाबाई सुरेश चौधरी व सोहेल असीम व्होरा यांच्या मालकीच्या वीज मीटरमध्ये फेरफार करण्यात आल्याची माहिती वीज कंपनीला मिळाली होती़ त्यांनी ८ जानेवारी रोजी तपासणी केल्यानंतर मीटर मंद गतीने चालत असल्याचे समोर आले होते़ त्याची तांत्रिक तपासणी केल्यावर फेरफार केल्याचे स्पष्ट झाले होते़ यातून वीज वितरण कंपनीचे अभियंता गजानन वसंत कोष्टी यांच्या फिर्यादीवरुन रंजनाबाई चौधरी व सोहेल व्होरा यांच्याविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला़ दोघांनी २४ महिन्यात ६ हजार ५९३ युनीटची चोरी करुन कंपनीची फसवणूक केल्याचे कंपनीकडून देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़

Web Title: Thousands of power theft by manipulating meters