पाईप लाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:58 IST2021-02-21T04:58:14+5:302021-02-21T04:58:14+5:30

येथून वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू असते. साहजिकच हा खड्डा वाहन चालकांसाठी धोकेदायक ठरला असल्याचे चालक सांगतात. वास्तविक गेल्या अनेक ...

Thousands of liters of water wasted due to burst pipeline | पाईप लाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी

पाईप लाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी

येथून वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू असते. साहजिकच हा खड्डा वाहन चालकांसाठी धोकेदायक ठरला असल्याचे चालक सांगतात. वास्तविक गेल्या अनेक दिवसांपासून हा खोल खड्डा पडला आहे. पालिकेला तो दिसू नये या बाबत वाहन चालक आश्चर्य व्यक्त करीत आहे. अपघाताची शक्यता लक्षात घेऊन पालिकेच्या बांधकाम विभागाने तातडीने खड्डा बुजावावा, अशी वाहनचालकांची मागणी आहे.

शहरातील फुटलेल्या पाईप लाईन दुरुस्तीसाठी पाणी विभागाकडे चौकशी करून लागलीच कार्यवाही करते.-सपना वसावा. मुख्याधिकारी नगरपालिका, तळोदा.

मेन रोड वरील ही पाईप लाईन गेल्या अनेक दिवसांपासून फुटली आहे. रत्यावरच पाणी वाहत असल्यामुळे तेथूनच कसरत करत वाहन काढावे लागत असतात. काही वेळेस चिखल पादचारीवर उडाला तर नाराजी ओढवून घ्यावी लागत असते. मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यामुळे पालिकेने दुरुस्ती काम हाती घ्यावे, -अनिल माळी, नागरिक तळोदा

Web Title: Thousands of liters of water wasted due to burst pipeline