शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त पाड्यांची तहान भागणार तरी कधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यात यंदा भूजल पातळी दीड मीटरने वर आली असल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट झाली आहे. यातून जिल्ह्यात ...

नंदुरबार : जिल्ह्यात यंदा भूजल पातळी दीड मीटरने वर आली असल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट झाली आहे. यातून जिल्ह्यात ९२ गावे आणि १८८ पाडे टंचाईग्रस्त असल्याने त्याठिकाणी उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले होते. जानेवारी ते मार्चपर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील या गाव पाड्यांवर टंचाई दिवसेंदिवस वाढत असतानाही उपाययोजनांना मात्र गती आलेली नाही.

सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यातील सर्वाधिक गाव आणि पाड्यांचा या टंचाई आराखड्यात समावेश करण्यात आल्याने टंचाई आराखड्यानुसार उपाययोजना करण्याचे नियोजन होते. परंतू मार्च संपूनही या सर्वच गावांमध्ये उपाययोजनांच सुरुच झालेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यात दोन पाड्यांवर यंदाही टँकर लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे टँकर सुरु होणार असले तरी याठिकाणी भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी भेट देवून पाहणी करणार होते. परंतू ही पाहणीही झालेली नसल्याने टँकर सुरु होण्यास खो मिळाला आहे. धडगाव तालुक्यातील रोषमाळ खुर्दसह १५ गावांमध्ये पाणीटंचाई असल्याने त्याठिकाणी पाणी पुरवठा विभागाचे भूवैज्ञानिक भेट देवून पाहणी करणार होते. परंतू अधिका-यांनी या गावांना भेटीच दिल्या नसल्याचा दावा स्थानिक ग्रामस्थांकडून केला जात आहे.

जिल्ह्यात एकूण ९५२ आवे आहेत. यंदा टंचाईग्रस्त म्हणून समोर आलेल्या ९२ गावे आणि १८८ पाड्यांसाठी २८८ विंधनविहिरी खोदल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ३७ ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. ३० बोअरवेल तर ४८ पाणी योजनांची दुरुस्ती प्रस्तावित आहे. परंतू यातील कोणत्याच कामाला गती नसल्याने टंचाईपासून सुटका होणार कशी असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून दरवर्षी विंधन विहिरींचे खोदकाम करण्याबाबत उद्दीष्ट्य घेतले जाते. परंतू प्रत्यक्षात विंधन विहिरींचे खोदकाम मात्र पावसाळ्यापर्यंत सुरु ठेवत हातपंप बसवण्यास टाळाटाळ केले जात असल्याचे प्रकार यापूर्वी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाच्या २८८ विधंनविहिरी ह्या मार्चपूर्वी पूर्ण होणार असे सांगण्यात आले असले तरी या विहिरी जूनपर्यंतही पूर्ण होणे शक्य नसल्याचे विभागाच्या कामाकाजावरुन दिसून येत आहे.