शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
पंतप्रधानांच्या आदेशाला भाजप नेत्यांकडून केराची टोपली; दुसऱ्याच दिवशी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलीस ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
5
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
6
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
7
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
8
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
10
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
11
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
13
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
14
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
15
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
16
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
17
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
18
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
19
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
20
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा सुरू करतांना हलगर्जीपणा होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 12:40 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  आश्रमशाळा सुरू करतांना कोरोनाची आवश्यक ती खबरदारी घ्यावी. आदिवासी दुर्गम भागाने कोरोनाला थोपवून ...

n  लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  आश्रमशाळा सुरू करतांना कोरोनाची आवश्यक ती खबरदारी घ्यावी. आदिवासी दुर्गम भागाने कोरोनाला थोपवून ठेवले आहे. आश्रमशाळांचे निमित्त तेथे कोरोनाचा शिरकाव करण्यास होऊ नये अशी अपेक्षा आदिवासी डॅाक्टर असोसिएशनतर्फे अध्यक्ष डॅा.राजेश वळवी यांनी व्यक्त केली आहे. याबाबत आदिवासी विकास मंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. 
कोरोनाच्या संक्रमण सुरू असतांना आश्रमशाळाही सुरू होत आहेत.  जिल्हयातील गरीब आदिवासी समाजाची मुलेच हया आश्रमशाळेत शिकत आहेत. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर योग्य खबरदारी घेतली नाही तर हा आजार खेडयापाडयात पसरायला वेळ लागणार नाही. कारण सर्व शाळा सुरु होण्याआधी करण्यात आलेल्या तपासणीत अनेक शिक्षक हे पॉझिटिव्ह आले आहेत.
सर्व प्रकारच्या आश्रम शाळेत सरकारने नेमुन दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे व जो हलगर्जिपणा करत असेल त्यास कठोर शिक्षा व्हावी.  आश्रम शाळेत मुलांसाठी व शाळेत काम करणा-या सर्वांसाठी मास्क, सॅनिटाझर, हॅडवॉश सारखे सर्व साहित्य मुबलक प्रमाणात व जोपर्यंत लसिकरण होत नाही तोपर्यंत उपलब्ध करुन द्यावे.  
सर्व आश्रमशाळेत काम करणा-या सर्व स्टाफची कोरोना तपासणी दर १५ दिवसांनी करण्यात यावी.  शाळा व वस्तीगृह नियमितपणे व वारंवार निर्जतुकीकरण करावे.  एखादा विद्यार्थी आजारी पडल्यास परस्पर घरी पाठविण्यात येऊ नये. हया सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती स्थापन करुन त्यात प्रामुख्याने पालक, समुदाय / मानसेवी वैद्यकिय अधिकारी, एएनएम, आशा व सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी नेमावे. शासनाने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे अशा  परीस्थितीत योग्य वेळेवर व वैद्यकिय तज्ञांच्या सल्ल्याने शाळा बंद करण्यात याव्या. हयासर्व बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास आपण नक्किच कोरानाला दुर राखण्यात यशस्वी होऊ व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकनासही होणार नाही. अशी अपेक्षाही निवेदनात व्यक्त करण्यात आली      आहे.