शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्याबाबत स्पष्टता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/कोठार : आश्रमशाळा नियमित सुरु करणे व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नसून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/कोठार : आश्रमशाळा नियमित सुरु करणे व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नसून सोमवार १५ जूनपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्रमशाळांमध्ये उपस्थित राहण्यासोबत आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, प्राथमिक व माध्यमिक शाळांबाबतही स्पष्ट आदेश नाहीत. शाळांकडून मात्र सर्व माहिती गोळा करण्यात आली आहे.१५ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू करण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यादृष्टीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांकडून आवश्यक ती माहिती गोळा केली आहे. ज्या ठिकाणी अद्याप एकही रुग्ण आढळला नसेल अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून शाळा सुरू करता येतील का? याचीही चाचपणी घेतली जात आहे.शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये पहिले ते आठवीची पुस्तके पोहच केली आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके वाटप करण्याचा प्रघात आहे. परंतु यंदा विद्यार्थीच शाळेत नसल्याने पुस्तक कसे वाटप होतील हा देखील प्रश्न आहे.आदिवासी विकास विभागाच्या नाशिक अप्पर आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाºया नाशिक, कळवण, राजुर, धुळे, तळोदा, नंदुरबार, यावल या प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थित राहण्याचे व सर्व कर्मचाºयांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचे आदेश देण्यात यावेत अश्या सूचना संबंधित प्रकल्प अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाºया शासकीय व अनुदानित आश्रमशाळा या निवासी शाळा आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवासी शाळा कशा प्रकारे सुरू कराव्यात हा मोठा प्रश्न शासन व प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून केंद्रनिहाय आश्रमशाळां शिक्षकांना थेट विद्यार्थ्यांच्या घरी पाठवून त्याना गृहपाठ देणे व त्यांच्याकडून अभ्यास कडून घेणं, त्यांच्या लाभाचे अन्नधान्य व इतर सुविधा घरपोच देणे, यासारख्या बाबीवर आदिवासी विकास विभागाकडून सध्या विचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे.शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शाळांमधील आॅनलाइन व अन्य शिक्षण तसेच शाळा सुरू होण्यापूवीर्ची इतर शैक्षणिक कामे करणे गरजेचे आहे. त्यामुळे नाशिक विभागातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी १५ जूनपासून आश्रम शाळेत नियमितपणे उपस्थिती राहणे बाबत सूचित करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधारणत: १५ मार्च पासून सर्व आश्रमशाळा बंद आहेत. शिक्षकांनासुद्धा घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु आश्रमशाळेचे बरेचसे शिक्षक परजिल्ह्यातील असल्याने लॉकडॉऊनमध्ये शिथीलता मिळाल्यानंतर ते गावाकडे परतले होते. आता अनेक शिक्षक आश्रमशाळेच्या ठिकाणी मुख्यालयी हजर होणार आहेत. आरोग्य तपासणी व इतर औपचारिक बाबी पूर्ण करून त्यांना सात दिवस होम क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा यांनी मुख्याध्यापकांच्या आॅनलाईन घेतलेल्या बैठकीत दिल्या आहेत.

शासनाकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात काहीही सुचना नाही. सोमवारी शिक्षकांनी शाळेवर जाणेही सक्तीचे नाही. परंतु पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके भेटली तर ते अभ्यासाला सुरुवात करू शकतील. डिजीटल शिक्षणासाठी शाळा, शिक्षक, पालकांना आवाहन करण्यात आले आहे. जेथे शक्य असेल तेथे दिक्षा अ‍ॅपने डिजीटल शिक्षण देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.-एम.व्ही,कदम, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग.