शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
4
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
5
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
6
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
7
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
8
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
9
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
10
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
11
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
12
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
13
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
14
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
15
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
16
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
17
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
18
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
19
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
20
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात असेही आहेत तलाठी ज्यांच्या कधी होईनात भेटीगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 13:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महसूल दप्तरी सर्वाधिक महत्त्वपूर्ण पद म्हणून तलाठीकडे पाहिले जाते़ ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महसूल दप्तरी सर्वाधिक महत्त्वपूर्ण पद म्हणून तलाठीकडे पाहिले जाते़ ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक आणि महसूल प्रशासन यांच्या महत्त्वपूर्ण दुवा म्हणून तलाठी पदाची निर्मिती केली गेली असावी़ परंतू जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी तलाठी कार्यालये दिवसभर तर काही ठिकाणी दुपारनंतर बंद केली जात असल्याचे प्रकार सुरू आहेत़
‘अप्पा’ कधी येणार म्हणून वाट पाहणारे बाहेर बसून राहूनही त्यांची तलाठी गाठ पडत नसल्याचे दिसून आले़ ‘लोकमत’ने बुधवार आणि गुरूवार अशा दोन दिवसात जिल्ह्यातील विविध भागात तलाठी कार्यालयांची स्थिती पडताळून पाहिली होती़ यात काही ठिकाणी दिवसा आणि काही ठिकाणी दुपारून तलाठीच आले नसल्याचे समोर आले़ धडगाव तालुक्यात दुपारी चारनंतर एकही तलाठी भेटत नसल्याने नागरिकांकडून सांगण्यात आले़
नंदुरबार
नंदुरबार तालुक्यात एकूण ४४ सजा आहेत़ यासाठी ३६ तलाठी कार्यारत असून आठ पदे रिक्त आहेत़ शहरातील मेघनगर भागात तलाठी भवन निर्माण करण्यात आले आहे़ याठिकाणी तलाठींची व्यवस्था केली गेली आहे़ परंतु बºयाचवेळा दुपारून या कार्यालयाला टाळे असते़ जुन्या तहसील कार्यालयातही बºयाचवेळा तलाठी भेटत नसल्याचे दिसून आले आहे़
अक्कलकुवा
अक्कलकुवा तालुक्यात काही तलाठी मुख्यालयी राहत असून अधिकाधिक तलाठी हे बाहेर गावाहून येत असल्याचे दिसून येते़ अक्कलकुवा शहरातील तलाठी भवन तलाठींच्या उपस्थितीअभावी बºयाचवेळा बंद असले़ शहरात राहणारे काहीजण घरून कार्यालय चालवत आहेत़ अक्कलकुवा तालुक्यात तलाठींच्या ३४ सजा आहेत़ तेथे २६ तलाठी कार्यरत असून ८ पदे रिक्त आहेत़ तहसील कार्यालय शेजारी तालुक्यातील तलाठ्यांसाठी तलाठी भवन बांधण्यात आले आहे़ याठिकाणी तलाठी आपल्या सजेतील नागरिकांना सेवा देत असत मात्र अलीकडे तलाठी भवन बंद असल्याचे दिसून येत आहे़ बाहेरगावाहून येणाºया तलाठींची वाट बघत अनेक जण थांबून राहत राहत असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे़
तळोदा
तळोदा शहरात तलाठी कार्यालय सुरू असल्याचे तसेच नागरिकांची गर्दी दिसून आली़ ग्रामीण भागात तलाठी कार्यालये बंद असल्याने मात्र नाराजी व्यक्त करण्यात आली़ काही ठिकाणी कार्यालये नसल्याने तलाठी ग्रामपंचायतीत बसत असल्याचे समोर आले़ दरम्यान तळोदा शहरात कार्यालय सुरू असल्याने कामे होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले़
शहादा
शहादा शहर व परिसरात मलोणी, लोणखेडा, पाडळदा, उंटावद, धुरखेडा, कुकडेल, पुरूषोत्तमनगर आदी गावांमध्ये तलाठी सजा आहेत़ याठिकाणी तलाठींची नियुक्ती करण्यात आली आहे़ या ठिकाणी दरदिवशी कामकाज होत असले तरी त्यात विलंब होत असल्याची माहिती देण्यात आली़ दुपारनंतर तलाठी भेटत नसल्याचे सांगण्यात आले़ शहादा शहरात मंडळाधिकारी कार्यालयातच तलाठी कार्यालय आहे़ याठिकाणी दिवसभर नागरिकांची वर्दळ राहते़

जिल्ह्यात एकूण ९५२ गावे आहेत़ या गावांच्या सुविधांसाठी २२२ सजा निर्माण करण्यात आल्या आहेत़ या प्रत्येक सजेला एक तलाठी सध्या नियुक्त आहेत़ एकूण ३६ मंडळात नियुक्त असलेल्या तलाठींकडे कामाचा बोजा अधिक असल्याचे सांगण्यात आले़ एका तलाठीकडे साधारण १५ पेक्षा अधिक गावे असल्याने बºयाचवेळा कामात अडचणी येत असल्याची माहिती देण्यात आली़