शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा पंचायत समितीला मिळणार आता नवीन इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तळोदा येथील पंचायत समितीच्या बांधकाम इमारतीचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा येथील पंचायत समितीच्या बांधकाम इमारतीचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहे. आता पंचायत समितीच्या प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तळोदा पंचायत समितीची इमारत ब्रिटीशकालीन आहे. ही इमारत छोटीशी असल्यामुळे पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या अनेक विभागांचे समायोजन होत नाही. त्यामुळे प्रशासन व कृषी खात्या व्यतिरिक्त इतर सर्वच विभाग विखुरलेले आहेत. ही कार्यालये पंचायत समितीच्या प्रिमाईसेसमध्ये असली तरी प्रशासनास देखरेख ठेवणे अडचणीचे ठरत असते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांवरदेखील अंकुश राखता येत नाही. त्यामुळे काही कर्मचारी कार्यालयात सापडत नसल्याचा आरोप आहे. त्यातही कामासाठी येणाºया नागरिकांना कामे करतांना इकडे-तिकडे भटकावे लागत असते. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या सभागृहाची दुरवस्था झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागा नाही. त्यामुळे पदाधिकाºयांनी जनतेसाठी ांधण्यात आलेल्या सभागृहात आपले बस्तान बसविले आहे. परिणामी जनतेला बाहेरच पटांगणात बसावे लागत असते. साहजिकच पंचायत समितीसाठी प्रशस्त मध्यवर्ती इमारत उभारावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. लोकप्रतिनिधींकडेदेखील इमारतीची मागणी केली जात होती. या सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने तळोदा पंचायत समितीच्या इमारत बांधकामावर कार्यवाही करण्यासाठी प्रशासनास नुकतेच पत्र पाठविले असून, यात म्हटले आहे की, पंचायत समितीचा ठराव, इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट रिपोर्ट, बांधकामाचे वर्ष, जागा मालकीचा तपशील, सातबारा उतारा, बांधकामाचा क्षेत्रफळ, बांधकामाचा खर्च, शासन मंजूर आराखडा, तसेच इमारतीचे ढोबळ अंदाजपत्रक आदी बाबींची पूर्तता करून तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे नमूद करण्यात आले आहे. साहजिकच पंचायत समितीच्या इमारतीचा रखडलेला प्रश्न मार्गी लागणार असून, संबंधीत यंत्रणेने यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी जनतेने केली आहे. दरम्यान पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने पंचायत समितीच्या जागेचा सातबारा बदल करून मिळणेबाबत येथील उपविभागीय अधिकाºयांना पत्रे दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तळोद्याचे आमदार राजेश पाडवी यांनी पंचायत समितीस गेल्या महिन्यात भेट दिली होती. त्या वेळी पदाधिकाºयांनी त्यांच्याकडे इमारतीचा प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी त्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आमदार पाडवी यांनी जिल्हा विकास समितीच्या बैठकीत तळोदा पंचायत समितीच्या इमारतीचा प्रश्न उपस्थित करून त्याबाबत समितीचे लक्ष वेधले होते. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने याप्रकरणी दखल घेऊन संबंधीत अधिकाºयांना सूचना केली होती. साहजिकच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तळोदा पंचायत समितीच्या प्रशासनाला या प्रकरणी पत्र पाठवून ताबडतोब संपूण माहितीसह प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संबंधित सर्व यंत्रणांनी युद्ध पातळीवर पाठपुरावा करण्याची मागणी आहे.